श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्सव स्मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ दिनांक 8-1-1986 (सभार)
अहमदनगर तिळवण तेली समाज ट्रस्ट संत श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी (सुवर्ण महोत्सव 1936 ते 1986) अर्जुनराव इंगळे सेक्रेटरी, अहमदनगर तिळवण तेली समाज ट्रस्ट यांचे स्वागतपर भाषण
श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्सव स्मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ, अहमदनगर, दिनांक 8-1-1986 (सभार)
१५ ऑगष्ट १९६६ रोजी स्वातंत्र्य दिनाच्या शुभपर्वणीवर यांचा मुख्यमंत्री मा. ना. वसंतरावजी नाईक यांचे शुभहस्ते सन्मानपत्र देवून स्वातंत्र्य सैनिक रामचंद्र माधवराव दारुणकर यांचा सत्कार करण्यात आला.
कै. हरिभाऊ भाऊ देवकर यांना हरिभट मामा म्हणून नावाने हाक मारीत असे. एकंदर चार भाऊ १) कै. रंभाजी भाऊ २) कै. हरिभाऊ भाऊ ३) कै. दगडूभाऊ ४) कै. सहादु भाऊ दाळ, मंडई येथील जे. श्री विठ्ठल मंदिरा करिता ज्याने जागा दिली ते कै. सावळेराम गुंडिबा देवकर यांचे ह सख्ख पुतणे होय. कै. हरिभाऊ यांना दोन पत्नीपासून दोन मुली झाल्या. एक मुलगी नागले घराण्यात दिली व दूसरी मुलगी साळुंखे घराण्यात दिली. त्यांना प्रत्येकी घर जागा देण्यात आली.
श्री. काशिनाथ रघुनाथ दारुणकर (कारभारी) हे नगर येथील तिळवण तेली समाजातील जुने कार्यकर्ते होय. वंशपरंपरेने समाजाचे कारभारीपद यांचेकडे आलेले असुन यांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यक्रम पार पडत आले आहे वडिलांनी प्रयत्नाने गरिबीवर' मात केली.
कै. गणपतराव विश्राम काळे मुळचे राहणारे वाळकी म्हणून वाळकीकर या नावाने ओळखले जात शरीरयष्टी सडपातळ, उंच काठी गौरवर्णीः हट्टी स्वभाव व रागिट. वडिलांशी पटले नाही. त्यामुळे त्यांचे १५ व्या वर्षी लग्न होवून सासूरवाडीस (काष्टी) तेलघाण्याचा धंदा, दौंड काष्टी असा तेलाचा व्यापार करीत. नंतर काही दिवसांनी परत वाळकीस सहकुटुंब आले. परत काही दिवसांनी नगर. माळीवाडा वेशीजवळ जागेत तेलाचा धंदा सुरु केला.