Sant Santaji Maharaj Jagnade
श्री. संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती ८ डिसेंबर रोजी सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये साजरी केली जाणार आहे. याबाबत राज्य सरकारने नुकतेच शासन परिपत्रक जारी केले आहे. संताजी महाराज हे संत तुकाराम महाराज यांच्या चौदा टाळकऱ्यांपैकी एक प्रमुख होते. त्यांच्या अभंग गाथेचे लेखनही संताजी महाराज यांनी केलेले आहे. सुदुंबरे ( ता. मावळ ) येथे संताजी महाराज यांचे समाधिस्थळ आहे. येथील क्षेत्रास राज्य सरकारने तीर्थक्षेत्राचा दर्जा दिलेला आहे.
साकुरी : शिर्डी शहर तेली समाजाच्या वतीने शिर्डी येथे तेली समाज बांधवांची बैठक पार पडली. त्यात विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.यात प्रामुख्याने श्री संताजी महाराज जगनाडे जयंती नगरपंचायत शिर्डी येथे साजरा करण्यात येणार आहे. तसेच तेली समाज संघटनच्या शिर्डी शहर अध्यक्षपदी दीपक चौधरी तर शिर्डी शहर कार्याध्यक्षपदी सोमनाथ महाले यांची निवड करण्यात आली आहे.
सोनगांव ता. राहुरी येथील शुभम अनिल भोत यांची भाजपा ओबीसी युवा मोर्चा च्या अहमदनगर जिल्हा सचिव पदी निवड करण्यात आली. सुभाष घाटे यांच्या नेतृत्वात सामाजिक क्षेञात काम करत असताना भाजपा नेतृत्वाने शुभम भोत यांची पक्षनिष्ठा पाहता त्यांना पक्षाची जबाबदारी दिली.यानिवडीबद्दल मा. ऊर्जामंञी चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे, सुभाष घाटे यांच्या मार्गदर्शनात
नाशिक शहर तेली समाज वधू-वर पालक परिचय पुस्तिका २५ डिसेंबर २०२११ डिसेंबर २०२१ नंतर आलेले फॉर्म कुठेही प्रकाशित केले जाणार नाहीत. याची नोंद घ्यावी. सुचना काळजी पूर्वक वाचून फॉर्म भरावा. फॉर्म पाठविण्याचा व वधू-वर सूची मिळण्याचा पत्ता श्री संताजी मंगल कार्यालय अशोक स्तंभ, नाशिक - ४२२ ००१. फोन : (०२५३) २५७६४२५, फॉर्म स्विकारण्याची वेळ : सकाळी १० ते सायं. ६ (रविवार व सुट्टीच्या दिवशी फॉर्म स्विकारले जातील) .
तेली समाज वधू - वर मेळावा जवाहर विद्यार्थी गृहात नाव नोंदणी सुरुतेली समाजातील विवाह योग्य युवक-युवतींची निःशुल्क नोंदणी 5 जानेवारी पासून 30 मार्च 2021 पर्यंत सुरु करण्यात आली आहे. तेली समाजातील इच्छुक युवक-युवतींनी कार्यालयीन वेळेत सिव्हील लाइन्स व नंदनवन येथील कार्यालयात दोन फोटोसह संपूर्ण माहितीसह फार्म भरुन नाव नोंदवूण घ्यावे.