Sant Santaji Maharaj Jagnade
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक (तेली) हा सभेच्यावतीने श्री संताजी जगनाडे महाराज याच्या जंयतीचे औचित्य ८ डिसेंबर पासून राज्यात समाज जोडो रथयात्रा अभियान सुरु करण्यात आले आहे. रथयात्रेचे सोलापूरमध्ये आगमन होताच स्वागत व पूजन सोलापूर जिल्हा तैलिक महासभेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष अविनाश मार्तड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विशाल मार्तडे, शहराध्यक्ष अशोक कलशेट्टी,
परळी : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने समाज जोडो अभियान अंतर्गत श्री. संत संताजी जगनाडे महाराज पालखी रथाचे परळीकरांच्या वतीने मोटारसायकल रॅलीने भव्य स्वागत करण्यात आले. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने समाज जोडो अभियान अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात रथयात्रेस संत संताजी महाराज जयंती निमित्त (८ डिसेंबर) संताजी महाराज जन्मस्थान चाकण येथून रथयात्रा सुरुवात करण्यात आली.
जळगाव जामोद संग्रामपुर तालुका तेली समाजाच्या सहकार्याने आयोजित राज्यस्तरीय वधू वर परीचय मेळावा समाज बांधवांच्या उपस्थितीत कोरोना नियमाचे पालन करून संपन्न झाला. कोरोणाच्या या नैसर्गिक आपत्तीमध्ये आपापल्या वधू व वरांचे लग्न जुळवण्यासाठी गावोगाव न फिरता जळगाव जामोद संग्रामपूर तेली समाजाच्या सहकार्याने वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन १९ डिसेंबर २०२१ रोजी जळगाव जामोद येथे सकाळी दहा ते पाच या कालावधीत करण्यात आले होते.
तेली समाज सेवक मंडळ अंतर्गत व तेली समाज यांच्या सहकार्याने, भव्य राज्यस्तरीय तेली समाज वधु-वर पालक परिचय मेळावा व सामुदायिक विवाह सोहळा, औरंगाबाद (संभाजीनगर) रविवार दि.२७/०२/२०२२ रोजी सकाळी १० ते सायं.६ वाजे पर्यंत संपर्क कार्यालयः अक्षयदिप प्लाझा, टाऊन सेंटर, सिडको एन-१, सिडको बसस्थानकाजवळ, औरंगाबाद
श्री शनैश्वर फौंडेशन, मुंबईच्या शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेस 28 वर्षे पूर्ण झाली. संस्थेतर्फे संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यातून व्यवसायिक शिक्षण घेणाऱ्या गरजू व होतकरू विद्यार्थ्याला प्रतिवर्षी प्रत्येकी 10 हजार रुपये प्रमाणे, दरवर्षी 120 विद्यार्थ्यांना 12 लाख रुपये पर्यंत रकमेच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येते. आतापर्यंत 500 विद्यार्थ्यांना 1 कोटी, 35 लाख रुपयांचे शिष्यवृत्ती वाटप करण्यात आले.