Sant Santaji Maharaj Jagnade
तेली समाज सेवक मंडळ अंतर्गत व तेली समाज यांच्या सहकार्याने, भव्य राज्यस्तरीय तेली समाज वधु-वर पालक परिचय मेळावा व सामुदायिक विवाह सोहळा, औरंगाबाद (संभाजीनगर) रविवार दि.२७/०२/२०२२ रोजी सकाळी १० ते सायं.६ वाजे पर्यंत संपर्क कार्यालयः अक्षयदिप प्लाझा, टाऊन सेंटर, सिडको एन-१, सिडको बसस्थानकाजवळ, औरंगाबाद
श्री शनैश्वर फौंडेशन, मुंबईच्या शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेस 28 वर्षे पूर्ण झाली. संस्थेतर्फे संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यातून व्यवसायिक शिक्षण घेणाऱ्या गरजू व होतकरू विद्यार्थ्याला प्रतिवर्षी प्रत्येकी 10 हजार रुपये प्रमाणे, दरवर्षी 120 विद्यार्थ्यांना 12 लाख रुपये पर्यंत रकमेच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येते. आतापर्यंत 500 विद्यार्थ्यांना 1 कोटी, 35 लाख रुपयांचे शिष्यवृत्ती वाटप करण्यात आले.
अकोला - राज्य तेली समाज समन्वय समितीच्यावतीने जळगाव जामोद संग्रामपूर तालुका तेली समाजाच्या सहकार्याने आयोजित राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळाव्यास समाज बांधवांनी कोरोना नियमाचे पालन करून उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नंदुरबार येथील कन्या असलेल्या प्रसिध्द उद्योजिका तथा झेप फाऊंडेशन व भारताच्या ग्लोबल वेलनेसच्या राजदूत डॉ.रेखा चौधरी यांनी लिहिलेल्या इंडिया एन्शेंट लेगसी ऑफ वेलनेस या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याहस्ते करण्यात आले. तसेच डॉ.रेखा चौधरी यांच्या लिखीत पुस्तिकेची पंतप्रधानांच्या ट्रिटर टीमने दखल घेतली आहे.
शिर्डी - तेली समाजाचे आराध्य दैवत संतश्रेष्ठ श्री संताजी महाराज जगनाडे तेली यांच्या जयंती निमि त्त शिर्डी येथील वाचनालयात तेली समाजाचे सदगुरू श्रेष्ठ संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची ३९७ वी जयंती साजरी करण्यात आली. शिर्डी शहरातील जेष्ठ सम जि बांधव व प्रगतशील शेतकरी हभप यशवंतराव वाघचौरे यांचे हस्ते प्रतिमपूजन करण्यात आले