Sant Santaji Maharaj Jagnade
अकोला - राज्य तेली समाज समन्वय समितीच्यावतीने जळगाव जामोद संग्रामपूर तालुका तेली समाजाच्या सहकार्याने आयोजित राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळाव्यास समाज बांधवांनी कोरोना नियमाचे पालन करून उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नंदुरबार येथील कन्या असलेल्या प्रसिध्द उद्योजिका तथा झेप फाऊंडेशन व भारताच्या ग्लोबल वेलनेसच्या राजदूत डॉ.रेखा चौधरी यांनी लिहिलेल्या इंडिया एन्शेंट लेगसी ऑफ वेलनेस या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याहस्ते करण्यात आले. तसेच डॉ.रेखा चौधरी यांच्या लिखीत पुस्तिकेची पंतप्रधानांच्या ट्रिटर टीमने दखल घेतली आहे.
शिर्डी - तेली समाजाचे आराध्य दैवत संतश्रेष्ठ श्री संताजी महाराज जगनाडे तेली यांच्या जयंती निमि त्त शिर्डी येथील वाचनालयात तेली समाजाचे सदगुरू श्रेष्ठ संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची ३९७ वी जयंती साजरी करण्यात आली. शिर्डी शहरातील जेष्ठ सम जि बांधव व प्रगतशील शेतकरी हभप यशवंतराव वाघचौरे यांचे हस्ते प्रतिमपूजन करण्यात आले
श्री संत जगनाडे महाराज यांच्या 397 जयंती निमित्त श्री चौंडेश्वरी मंदिर पुंडलिक नगर, गजानन नगर रोड, औरंगाबाद येथे जयंती सोहळा व महाप्रसादाचा कार्यक्रम औरंगाबाद तेली समाज औरंगाबाद व संताजी महिला व पुरुष बचत गट औरंगाबाद. आयोजित केला होता त्याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते आमचे लाडके आमदार अतुलजी सावे साहेब, तेली समाजाची तडफदार नेते
चांदवड - स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त येथील श्री नेमिनाथ जैन माध्यमिक विद्यालयात संत संताजी महाराज जगनाडे यांच्या प्रतिमेला प्राचार्य डॉ. संगीता बाफना यांनी पुष्पहार अर्पण केला. उपप्राचार्य संदिप समदडिया यांनी प्रास्ताविक केले तर उपशिक्षक ए. यू. सोनवणे यांनी मनोगतातून संत जगनाडे महाराज यांचा जीवनप्रवास उलगडून सांगितला.