अध्यक्ष शिवदास उबाळे यांची माहिती
पुणे जिल्ह्यातील वार्षिक विकास योजनेंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे यांनी श्रीक्षेत्र सुदुंबरे येथील श्रीसंत संताजी महाराज मंदिर परिसरात भक्तनिवास बांधकामाकरीता २० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष शिवदास उबाळे यांनी दिली.
जळगाव - नाशिक विभागीय तैलिक महासभा अध्यक्ष तथा जळगाव जिल्हा तेली समाज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आर. टी. अण्णा चौधरी (वय ८३) यांचे शनिवार दि. १ मे रोजी पहाटे ४ वाजता हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र तेली समाजात पोकळी निर्माण झाली.
आपल्याला होणारे बहुतांश आजार, हे शरिरातील त्रिदोषांच्या असमतोलामुळे होतात. आहाराचे संतुलन बिघडण्यात रिफाईंड तेल बर्याचदा कारणीभूत ठरते. रिफाईंड तेल निर्माण करण्यासाठी ‘गॅसोलिन’, ‘सिंथेटिक’, ‘अॅन्टिऑक्सिडंट’, आदी प्रकारची रसायने उपयोगात आणली जातात. ‘रिफाईंड’ तेलाचा अजिबात वास येत नाही; कारण त्यात एकही प्रकारचे जीवनसत्त्व शेष रहात नाही. त्यातील चिकटपणाही नाहीसा झालेला असतो;
महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा प्रदेशाध्यक्ष खासदार श्री. रामदासजी तडस महासचिव डॉ.भूषणजी कर्डिले यांच्या आदेशानुसार महिला दिनानिमित्त ७ मार्च २०२१ रोजी दुपारी ३.०० वाजता zoom app वर महिला दिनाचं औचित्य साधून महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात करताना रायगड विभागीय महिला अध्यक्षा प्रियाताई डिंगोरकर यांना सर्वानूमते कार्यक्रमाचे अध्यक्षा बनविण्यात आले. नाशिक विभागीय महिला अध्यक्षा सौ. विद्याताई कर्पे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, महिलांची महिन्यातून एकदा अशी आँनलाईन सभा व्हावी असे मत मांडले.
श्री. दिलीप गणपत खोंड (युटीलिटी ऑपरेटर) व्ही.व्ही.एफ. इंडिया लि. तळोजा, रायगड कंपनीत सन १९९४ पासून कार्यरत आहेत. अचूक काम, अधिक उत्पादन, सुरक्षा व उत्तम दर्जा या कामाच्या पद्धतीमुळे व्यवस्थापनाने गौरविले आहे. कंपनीच्या सर्व बसेसमध्ये फर्स्ट एड बॉक्स बसवण्याच्या संकल्पनेस व्यवस्थापनाने पुरस्कार देऊन कार्यान्वित केली. शासनाने विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून निवड केली आहे.