खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने रविवार, दिनांक २८ नोव्हेंबर २०२१ रोजी धुळे महानगरी मध्ये समाजभूषण स्व. दत्तात्रय लालचंद महाले नगर, हिरे भवन, कोर्टासमोर, स्टेशन रोड, धुळे याठिकाणी वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.14/11/2021 रोज रविवारला स्वामी विवेकानंद राष्ट्रीय ज्ञानपीठ, जळगाव जामोद येथे तेली समाज वधू - वर व पालक परिचय मेळावा समितीची कार्यकर्ता बैठक गणेशभाऊ गोतमारे (सोनाळा) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
शिरपूर - राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने नविन मतदार नोंदणी ऑनलाइन पद्धतीने सुरू असून त्यात अनेक अडचणी निर्माण होत आहेत त्यामूळे सामान्य व गरीब व्यक्तींची गैरसोय टाळण्यासाठी ती ऑफलाईन पद्धतीने करण्याची मागणी प्रदेश तेली महासंघ युवक आघाडीचे राज्याचे प्रदेश कार्याध्यक्ष शामकांत ईशी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
संताजी सेवा प्रतिष्ठान, पिंपरी-चिंचवड आयोजित राज्यस्तरीय तेली समाज वधु-वर पालक परिचय मेळावा - २०२१
रविवार दि. १२ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ९ ते सायं. ६ वाजेपर्यंत.
मेळाव्याचे ठिकाण - कै. रंगनाथशेठ सितारामशेठ मेहेर नगर वैकुंठवासी ह. भ. प. माधवराव बबनराव अंबिके सभागृह राजमाता जिजाऊ सभागह ईएसआय हॉस्पीटल समोर, मोहन नगर, चिंचवड स्टेशन, पुणे - ४११०१९
साई संताजी प्रतिष्ठान शिर्डी अंतर्गत अहमदनगर जिल्हा तेली समाज यांच्या सहकार्याने भव्य राज्यस्तरीय वधुवर पालक परिचय मेळावा व सामुदायिक विवाह सोहळा शिर्डी रविवार, दि. ५/१२/२०२१ रोजी सकाळी १० ते सायं. ६ वाजेपर्यंत. स्थळ : सिद्ध संकल्प लॉन्स, मंगल कार्यालय, नगर मनमाड हायवे, साकुरी, ता. राहाता (शिर्डी)