Sant Santaji Maharaj Jagnade
नगर - संत जगनाडे महाराजांनी दाखविलेल्या मार्गावर आपण चालले पाहिजे. संतांचे विचार आत्मसात करुन जीवनात त्याचे आचरण करावे. समाजाचे आपण काही देणे लागतो, या भावनेने काम केले पाहिजे. तेव्हाच समाजाचा उध्दार होत असतो, असे प्रतिपादन तिळवण तेली समाज ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश सैंदर यांनी केले.
धुळे - खान्देश तेली समाज मंडळाची वार्षिक बैठक रविवार,दिनांक ८ मे रोजी दुपारी तीन वाजता संपन्न झाली. या बैठकीत खान्देश तेली समाज मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी नियोजित नोव्हेंबर महिन्यात होणारा आहे वधु-वर परिचय मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार केलेला आहे.
धुळे - येथील खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने मातृदिनाच्या निमित्ताने रविवार, ८ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या अभूतपूर्व अशा मातृ-वंदन सोहळ्यासाठी वेगवेगळ्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्राहून जलतीर्थ संकलित करण्यात येत आहे.
लातूर वीरशैव तेली समाजाच्या वतीने मा. ना. श्री अमित देशमुख साहेब ( पालक मंत्री तथा वैदकीय शिक्षण मंत्री,महाराष्ट्र राज्य) यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र चिकित्सा शिबीर आयोजित केले होते. आपण आपल्या समाजातील जेष्ठ नागरिकांना आव्हान केले होते. त्यानिमित्ताने आपल्यातील 18 जेष्ठ नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. त्यापैकी आज जगप्रसिद्ध डॉ. श्री तात्याराव लहाने साहेब यांच्या हस्ते मोतिबिंदु शस्त्रक्रिया खालील जेष्ठ बांधवांची करण्यात आली.