धुळे - खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील श्री संताजी महाराजांची ३९९ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.जयंतीच्या निमित्ताने धुळे महानगरातील राजवाडे बँके जवळ असलेल्या गुरु शिष्य स्मारकातील श्री संताजी महाराज व तुकाराम महाराज
बरबडा ग्रामपंचायत कार्यालय येथे श्री तुकाराम महाराज यांच्या गाथेचे लेखनकर्ते तेली समाजाचे आराध्या दैवत संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच माधव कोलगाणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. त्यानंतर गजानन महाराज स्वामी, बू इंद्रवाड, प्रल्हाद जेटेवाड, पत्रकार किरण हनमंते, देविदास जेठेवाड,
ठाणे महानगर तेली समाज संस्थेच्या माध्यमातून श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या ३९९ जयंती कार्यक्रमा अंतर्गत ८ डिसेंबर २०२३ रोजी समाजातील काही प्रतिनिधी विविध शासकीय कार्यालयात जयंती उत्सवात सहभागी झाले होते. श्री अनंत तेली. (ठाणे महानगर पालिका आणि नवीमुंबई महानगरपालिका बोधचिन्हकार व जेष्ठ सल्लागार) श्री रघुनाथ चौधरी (ज्येष्ठ सल्लागार)
दिनांक ८ डिसेंबर २०२३ वार शुक्रवार रोजी आपल्या समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम कन्नड शहरात आयोजित करण्यात आला आहे. तरी या कार्यक्रमास आपली, आपल्या संपूर्ण परिवाराची उपस्थिती प्रार्थनिय आहे. आपण समाजाचे काही देणे लागतो त्यामुळे या सोहळ्यास आपल्या घरातील लहान-मोठ्या प्रत्येक सदस्याची उपस्थिती प्रार्थनिय आहे.
श्री संताजी महाराज जगनाडे जयंती उत्सव सोहळा दि. ८ डिसेंबर २०२३ रोजी दु. ४.०० वा. जयंती पालखीचा मार्ग : पंचवटी कारंजा पासून वालझाडे मंगल कार्यालय, जुना आडगांव नाकापर्यंत सर्व समाज बांधवांनी सहकुटुंब सहपरिवार आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, ही विनंती करण्यात आलेली आहे.