श्री क्षेत्र देहू, आळंदी, भंडारा डोंगर, पंढरपूर व पालखी तळ मार्ग विकास आराखडा अंतर्गत मौजे सुदुंबरे (ता. मावळ, जि. पुणे) येथील श्री संत जगनाडे महाराज यांच्या समाधीचा विकास व सौंदर्यीकरण आराखड्यास मान्यता मिळाली असून, यासाठी ६६.११८ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
मालेगावचे सुपुत्र राहुल यशवंत चौधरी चा धुळे येथे सत्कार करण्यात आला. खानदेश तेली समाज आयोजित वधूवर मेळाव्यात राहुल चौधरीने धुळे येथील शिवपुराण प्रसंगी केलेल्या बहुमोल सहकार्याबद्दल धुळे तेली समाजातर्फे राहुल चौधरीला व्यासपीठावर गौरविण्यात आले . राहुल चौधरी व सार्व.बांधकाम मंत्री दादा भुसे यांचे चिरंजीव आविष्कार भुसे यांचा शिवपुराण नियोजनात मोठा वाटा होता.
खान्देश तेली समाज महिला मंच पिंपरी-चिंचवड पुणे राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा - २६ जाने २०२४ मेळावा तारीख : शुक्रवार दिनांक २६ जाने २०२४ रोजी सकाळी १० वाजता कै. सारजाबाई तुळशिराम चौधरी (उंबरखेडकर) नगर कै. सुशिलाबाई शंकर चौधरी (बाघ) प्रवेशद्वार (श्री नागाई एंटरप्रायझेस, चिंचवड) कै. तुळशिराम काशिराम चौधरी (करंकाळ) तामसवाडी
अर्धापूर :- येथे प्रति वर्षीप्रमाणे याही वर्षी तेली समाज सेवाभावी संस्था नांदेड आयोजित वधू-वर पालक परिचय मेळावा दि. ३ डिसेंबर रविवार वामनराव पावडे मंगल कार्यालय पूर्णा रोड येथे. आयोजित केला आहे.
तेली सेवा समाज, मुंबई, तेली सेवा समाज कार्यालय, शंकरराव नराम पथ, पेनिनसुला कॉर्पोरेट पार्कच्या बाजूला, लोअर परेल, मुंबई ४०० ०१३. आयोजित कला व सांस्कृतिक विभाग प्रस्तुत हिंदी मराठी गाण्यांची सुरेल मेंफिल दिपावली संगीत रजनी २०२३, प्रमुख पाहुणे : श्री. विठ्ठल सावंत (नाट्यलेखक, दिग्दर्शक आणि प्रायोगिक रंगभूमी समीक्षक)