Sant Santaji Maharaj Jagnade
देशाची राजधानी असलेल्या दिल्ली येथील एैतिहासिक " जंतर मंतर " येथे देशभरातील अतिमागासवर्ग व भटके विमुक्त जमातींच्या विविध संघटनांनी आपल्या मागण्यासाठी आंदोलन केले. सध्या असलेल्या ओबीसी आरक्षणाचे (२७ %) वर्गीकरण करून ओबीसी मध्ये ३ गट पाडावेत, त्यात पहिल्या गट भटके विमुक्त जाती (९ % आरक्षण), दुसऱ्या गटात अतिमागास जाती (उदा.तेली, माळी, गोवारी, कोळी - ९ % आरक्षण) व तिसऱ्या गटात इतर मागासवर्गीय जातींचा समावेश करावा या मागणीकरिता आंदोलन केले.
दिल्ली प्रदेश तैलीक साहू सभेच्या वतीने रविवारी दि. २७ मार्च २०१६ रोजी वसंतोत्सव व होली मिलन हा कार्यक्रम अखिल भारतीय तैलिक साहू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आ.जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये नवी दिल्ली येथे संपन्न झाला. यावेळी राष्ट्रीय उपाध्क्ष प्रल्हाद मोदी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. रामदास तडस, महामंत्री रामलाल गुप्ता, राष्ट्रीय कार्याध्यक्ष डाॅ. प्रकाश सेठ, शुषमा शाहू व दिल्ली तैलिक साहू सभेचे अध्यक्ष एस राहुल उपस्थित होते.
पुणे :- श्री. संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था सुंदुंबरे या समाजाच्या शिखर संस्थेच्या सहचिटणीस पद नुकतेच रिक्त होते. संस्थेच्या कार्यकारणीची मिटींग श्री संत संताजी मंदिरात नुकतीच संपन्न झाली या वेळी संस्था अध्यक्ष श्री. जनार्दन गोपाळ शेठ जगनाडे यांनी श्री. दिपक सदाशीव पवार यांची नियुक्ती सहचिटणीस पद केली आहे.
आण्णांचे या समाज सेवेबरोबर अत्यंत महत्वाचे कार्य ते म्हणजे तेली समाजामधील मुला:मुलींची लग्ने जमविणे. अण्णणांनी अनेक गरिब मुलामुलींची लग्ने जमविलेी. या शिावाय विधवा, घटस्फोटीत यांच्या समस्या समजुन घेऊन पुन्हा एकदा त्यांच्या जीवनाची घडी बसवुन दिली. कितीतरी विधवा व घटस्फोटीत मुला मुलींची लग्न आण्णणांनी जमवुन दिली. त्याचप्रमाणे मुला-मुलींची पण लग्ने अण्णणांनी जमवुन दिलीत. अद्याप त्यांचे फोन आण्णांना येतात व आपल्या संसारात आनंदी व सुखी आहोत सांगतात. त्यावेळी आण्णणांना खुप आनंद व धन्यता वाटते. आपले आयुष्य सार्थकी लागल्याचे वाटते. जो कोणी आण्णांच्या आश्रयला यतो तो आण्णाांचा होतो. आणि आण्णा पण त्याचेच होता. आपल्याच घरातील व्यक्तीप्रमाणे प्रत्येक मुलामुलीच्या लग्नासाठी ते प्रयत्नशील असतात.
तुकोबांच्या अभंगावरील बंदी हुकूम, संत संताजी व आजचे स्वातंत्र्य. (भाग2)
गुलामगीरीची झळ संत संताजींनी अनुभवली होती, घाण्याचा किरकिर आवाज येतो म्हणुन मावळतीला वसवले होते. त्या वस्तीत तेलघाना घेताना कपडे तेलकट मळकट होत होते म्हणुन तेली आडवा जाणे व तेत्याचे तोंड अशुभ आहे हे सांगणारे ब्राह्मण शाहीच्या शास्त्राने त्यांना पोळले होते. शुद्र व सर्व स्त्री जात अशुभ आहे हे बिंबवले होते. देवाच्या दारात दिवसरात्र तेवणारा नंदा दिप तेल आहे म्हणुन जरी तेवत असला तरी तो तेल उत्पादक अशुभ ठरवणारे शास्त्र संताजींना अस्वस्थ नक्कीच करीत होते.