श्री. संताजी प्रतिष्ठाण कोथरूड हि मान्यताप्राप्त संस्था असुन संस्थेची सभासद संख्या दोन हजार पर्यंत आहे. संस्था दरवर्षी 26 जानेवारी ह्या दिवशीच हा कार्यक्रम आजपर्यंत घेत आलेली आहे. आणि या कार्यक्रमाची पुर्ण कल्पना पुणे परिसरातील सर्व समाज बंधु भगिनींना असल्यामुळे सर्वजन कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित राहतात कोणत्याही प्रकारचे पत्रक वगैरे न काढता फक्त कार्यक्रमाचे स्थळ वेळ मॅसेज द्वारे पाठवीले जाते.
स्वातंत्र्यातील योद्धा संत जोगापरमानंद व आमचे नेभळटपण (भाग 4) - मोहन देशमाने, प्रसिद्धी प्रमुख, श्री. संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदूंबरे
नगर जवळील भिंगार भींगारची वेस त्या वेशीजवळ भाऊसाहेब पतकी यांचे घर या घराजवळ क्षिरसागर यांचे घर घर कसले तर मातीने सारवलेल्या भिंती त्याावर गंजलेले पत्रे. दोन तीन पातीली एक तेलाचा डबा त्या जवळ बसलेले वयोवृद्ध क्षिरसागर. मी त्यांना जेंव्हा पाहिले तेंव्हा या स्वातंत्र्याची किव करावी वाटली. या स्वातंत्र्य वीराने इंग्रज अधीकारी गोळीबार करतोय म्हणून ती गाडीच उलथी पालथी केली. या पैलवान बांधवाचे पायच कायमचे निकामी केले. शिक्षा भोगावी लागली स्वातंत्र्यात मिळाले काय तर हे बुड टेकत चालणे. मी समाजातील स्वातंत्र सैनिकांचा इतिहास गोळा केला. त्यांचे पुस्तक ही प्रसिद्ध केले. पण यातील बर्याच जनांच्या घरात आपल्यात स्वातंत्र्य सैनक होते याची जाणीव पुसट होत चालली आहे. त्या घरात ही अवस्था तर समाजाला किती जाणीव असावी.a
सौ. सुनीता रमेश भोज. अध्यक्षा, गुरूकृपा बचत गट, पुणे कार्याध्यक्ष उत्कर्ष भिशी मंडळ, कोथरूड
महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिकवण सर्वजण विसरलेले आहोत. भारतात ओबीसींच्या 3744 जाती आहेत. त्यामुळे ओबीसील लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळाले पाहिजे. परंतु तसे होत नाही. त्यासाठी ओबीसींची जनगणना ब्रिटीशांनी 1931 साली केली होती. त्यानुसार ओबीसींची जातीनिहाय जनगणना तेव्हापासून 52 % च धरली गेली आहे. त्यानंतर ओबीसींध्ये प्रचंड वाढ होऊन टक्केवारी मध्येही वाढ झालेली आहे. परंतु जाणीवपुर्वक ओबीसींच जातीनिहाय जनगणना होऊ दिली नाही.
नांदेड, दि. 7 :- तेली समाज सेवाभावी संस्था नांदेडकच्या वतीने दि. 8 रोजी वामनराव धावडे मंगल कार्यालय, नांदेड येथे राज्यस्तरीय तेली समाज वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
श्री संताजी प्रतिष्ठाण नगर रोड पुणे - 14, नामफलक उद्घाटन व मकरसंक्राती निमित्त हळदी-कुंकू, तिळगुळ वाटप तसेच तुळशी रोप वाटप कार्यक्रम सौ. वसुंधराताई उबाळे, सभापती पंचायत समिती हवेली यांच्या हस्ते पार पडला. प्रतिष्ठाण तर्फे पहिल्याच वर्षी हळदी-कुंकवाला वाण द्या तुळशीच, रक्षण करा पर्यावरणाच ही सामाजिक वनीकरण वभागाची संकल्पना राबविण्यात आली.