सौ. सुनीता रमेश भोज. अध्यक्षा, गुरूकृपा बचत गट, पुणे कार्याध्यक्ष उत्कर्ष भिशी मंडळ, कोथरूड
महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिकवण सर्वजण विसरलेले आहोत. भारतात ओबीसींच्या 3744 जाती आहेत. त्यामुळे ओबीसील लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळाले पाहिजे. परंतु तसे होत नाही. त्यासाठी ओबीसींची जनगणना ब्रिटीशांनी 1931 साली केली होती. त्यानुसार ओबीसींची जातीनिहाय जनगणना तेव्हापासून 52 % च धरली गेली आहे. त्यानंतर ओबीसींध्ये प्रचंड वाढ होऊन टक्केवारी मध्येही वाढ झालेली आहे. परंतु जाणीवपुर्वक ओबीसींच जातीनिहाय जनगणना होऊ दिली नाही.
नांदेड, दि. 7 :- तेली समाज सेवाभावी संस्था नांदेडकच्या वतीने दि. 8 रोजी वामनराव धावडे मंगल कार्यालय, नांदेड येथे राज्यस्तरीय तेली समाज वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
श्री संताजी प्रतिष्ठाण नगर रोड पुणे - 14, नामफलक उद्घाटन व मकरसंक्राती निमित्त हळदी-कुंकू, तिळगुळ वाटप तसेच तुळशी रोप वाटप कार्यक्रम सौ. वसुंधराताई उबाळे, सभापती पंचायत समिती हवेली यांच्या हस्ते पार पडला. प्रतिष्ठाण तर्फे पहिल्याच वर्षी हळदी-कुंकवाला वाण द्या तुळशीच, रक्षण करा पर्यावरणाच ही सामाजिक वनीकरण वभागाची संकल्पना राबविण्यात आली.
स्वातंत्र्यातील योद्धा संत जोगापरमानंद व आमचे नेभळटपण (भाग 5) - मोहन देशमाने, प्रसिद्धी प्रमुख, श्री. संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदूंबरे
समता, स्वातंत्र्य यांचा बौद्ध काळ संपवल्या नंतर ब्राह्मण्यचे राज्य सुरू झाले. यादवांच्या काळात तर नावाला राजे यादव पण कारभार हेमाडपंत हे ब्राह्मण हाकत होते. ही जुलमी सत्ता नष्ट होताच मोंगल सत्ता आली. तीला उतरती कळा येताच पेशवाई आली. पेशवाई जाताच इंग्रजी सत्ता आली. इंग्रज जाताच काँग्रस आली. काँग्रेस जाताच भााजपा आली. नुसती सत्ता बदलली म्हणजे स्वातंत्र्य का ? आज विकासाचा पैसा आपल्या साठी येतो का ? घरातला मुलगा हुशार असुन उपयोग नाही तर की पैसे देतो यावर प्रवेश आसतो. मंडलने राखीव जागा दिल्या. त्या माराठ्यांनी मनगट व पैसा या बळावर पळवल्या. स्वातंत्र्या पसुन किमान शंभर ही आमदार समाजाचे होऊ शकले नाहीत फक्त दहा टक्के लोकसंख्येच नुसतेच बेसुर उमटत रहातात.
उमेदीच्या काळात नगर शहरात आपला ठसा उमटवल्या नंतर ते व श्री. गोकूळ काळे हे श्री क्षेत्र सुदूंबरे संस्थेत पदाधीकारी म्हणून कार्यरथ झाले. संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काही काळ कामकाज पाहिले. याच दरम्यान कै. केशरकाकु क्षिरसागर यांचा संबंध आला. महाराष्ट्रात प्रथम नगर शहरात त्या खासदार होताच जंगी सत्कार केला. केशरकाकु महाराष्ट्र तेली महासभेच्या अध्यक्षा होत्या. विदर्भात रूजलेली ही संघटना मराठवाड्यात नावा पुरती होती. पण हीच संघटना उरलेल्या महाराष्ट्रात नावा पुरती ही नव्हती. अहमदनगर शहरात देशपातळीवरील मिटींग 1994 च्या दरम्यान आयोजित करण्यात कै. प्रकाशशेठ यांनी पुढाकार घेतला. याच जाहिर मिटींग मध्ये काकु देशपातळीवर अध्यक्षा झाल्या.