श्री संताजी प्रतिष्ठाण नगर रोड पुणे - 14, नामफलक उद्घाटन व मकरसंक्राती निमित्त हळदी-कुंकू, तिळगुळ वाटप तसेच तुळशी रोप वाटप कार्यक्रम सौ. वसुंधराताई उबाळे, सभापती पंचायत समिती हवेली यांच्या हस्ते पार पडला. प्रतिष्ठाण तर्फे पहिल्याच वर्षी हळदी-कुंकवाला वाण द्या तुळशीच, रक्षण करा पर्यावरणाच ही सामाजिक वनीकरण विभागाची संकल्पना राबविण्यात आली.
भावपूर्ण श्रद्धांजली कै. गजानन (मंगल) श्रीधर घोडके
कान्हुर पठार, ता. पारनेर, जि. नगर
पुढे तिळवण तेली समाज अध्यक्ष पद भुषविण्याची संधी त्याना मिळाली. या पदाच्या माध्यमातुन त्यांनी समाज कल्यानास्तव अनेक उपक्रम राबविले. समाजोद्धाराची अनेक कामे करताना धार्मिक उपक्रम, हनुमान जयंती, मुंबई बाजार येथील समाजाचे हनुमान मंदिराचा जिर्णोद्धाार करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. जीवनाच्या अखेरच्या टप्यात ते अंत्यंत समाधानी होते.
आज दि.८-४-२०१६ शुक्रवारला स्थळ: प्रमिलाताई ओक हॉल नवीन बस स्टॅन्ड जवळ अकोला वेळ :दुपारी ३ते८ पर्यंत सर्व समाज बांधव व भगिनीनि जास्ती जास्त संख्येने उपस्थित राहावे.
जय संताजी सेवा समिती अकोला
शेकडो वर्ष महाराष्ट्राच्या सामाजीक, आर्थिक व धार्मिक परंपरेत दहशद मरजवणार्या ब्राह्मणी व्यवस्थेला हादरे देऊन बहुजन वर्गाला खंबीर करणारे संत संताजी श्री. संत संताजींच्या या महासंग्रामाला साथ सोबत देणारी त्यांची पत्नी खेडच्या कहाणे घराण्यातील. याच खेड म्हणजे आजच्या राजगुरूनगर मध्येच जन्मलेले व या मातीशी एकरूप झालेले श्री. दिलीप पोपटराव लोखंडे होत. खेडच्या सरदार चौकातील वेसी जवळ जगण्यचे साधन म्हणुन किराणा दुकान सुरू केले. समजण्याचे वय सुरू झाले तेंव्हा पासून पुड्या बांधणे विक्री करणे. गिर्हाईक संभाळणे हे संस्कार शालेय शिक्षणा बरोबर सुरू होते. गावातल्या शाळेतच 11 वी शिक्षण पुर्ण झाले. आणी मित्रा सोबत खेळ व इतर सामाजीक कामात रमता रमता ते व्यवसायात लक्ष देऊ लागले. सोबतीला दोन भाऊ व दोन बहिणी होत्या त्यांची जबाबदारी ते पुर्ण करीत होते