अकोला जिल्ह़यातील अकोट येथे श्री संत नरसिँग महाराज यात्रेनिमित्त निघालेल्या पालखीचे श्री संताजी सेना अकोट तर्फे स्वागत करण्यात आले...याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन संताजी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोदभाऊ देँडवे, सचिव जितेश नालट उपस्थित होते..शहरात निघालेल्या भव्य पालखीमध्ये विविध दिँड्या सामील झाल्या होत्या..पालखीचे पुजन तसेच स्वागताकरीता संताजी सेनेचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते..
संताजी महाराज अभंग व संत तुकाराम
चरिता गोधन । माझे गुंतले वचन ॥1॥
आम्हा येणे झाले । एका तेलीया कारणे ॥2॥
तिनमुठी मृतिका देख । तेंव्हा लोपविले मुख ॥3॥
आलो म्हणे तुका । संतु न्यावया विष्णुलोका ॥4॥
संत संताजी महाराजांचे अभ्ांग आमुचा तो घाणा त्रिगुण तिळाचा
आमुचा तो घाणा त्रिगुण तिळाचा ।
अंगी जोडियेला मन पावनाचा ॥1॥
भक्ती ही भावाची लाट आयकली ।
शांती शिळा ठेवली विवेकाची ॥2॥
आरती संत संताजी महाराजांची गाणी
आरती संतू संता । चरणी ठेविला माथा ।
साधूवर्ण कृपावंत । अभय देई तत्वता ॥1॥
जन्मोनिया चाकणाशी । धन्य केली पंचक्रोशी ।
शरण तुकयासी जाय । धन्य धन्य देही होय ॥2॥
मालेगाव - येथिल सामाजिक कार्यकर्ते गुलाबराव बाबुराव उचित (वय 85 वर्षे) यांचे दि. 25 नोव़हेंबर 2015 रोजी अल्पशः आजाराने दुःखद निधन झाले. मालेगाव महानगर तेली महासभेचे अध़्यक्ष्ा व ओबीसी सेवा संघाचे जिल्हाअध्यक्ष रमेश उचित यांचे ते मोठे बंधु होते. सर्व तेली समाज बांधवा तर्फे त्यांना भावपुर्ण श्रद्धाजीली