तेली गल्ली (गावकूसचे) सुरवातीचे दिवस होते. कुठेच धागेदोने नव्हते ते गोळा करून गुंफायचे होेते समाज संघटनाला एक दिशा द्यावयाची होती. आशा वेळी श्री. बंडोपंत गेनबा शेलार यांची ओळख झाली आणी एक भक्कम धागा सापडला आगदी पुर्वीच्या संघर्षाच्या काळात त्यांनी सहकार्य व विश्वास दिला जीवनाची सुरवात निमशासकीय नोकरी करीत सुरू केली परस्थीतीची जान होती समाज विचाराची प्रक्रिया होती. जमेल ते करण्याची तयारी होती. यातुनच ते धडपडत होते. श्री. संताजी पालखीला आपल्या वडीलांनी पहिला मदतीचा हात दिला. एका बैलाच्या छकड्यात पालखी ठेऊन श्री. संत संताजी महाराजांना पंढरपूरात घेऊन जात होते.
सन 1900 च्या दरम्यान सातारा जिल्ह्यातील कोरेगांव तालुक्या मधील कै. अंबाजी क्षिरसागर यांनी कुटूंबच बैलगाडीत बसवले. करडीच्या शोधात होते. करडी असेल तर तेलघाना चालेल तो चालला तर घर चालेल. सांगली मिरज करीत ते अथनी येथे गेले. या अथनीत काही काळ घाना सुर ठेवला. इथे ही निट जम बसेना. ओळखी पाळखी काढत हुबळी येथे पोहचले.
सातारा लगत असलेल्या भोर शहरातुन वडील पुण्यात आले शुन्यात उभे राहिले. या वेळी कै. माधवराव धोत्रे बांधकाम क्षेत्रात शिरले आगदी या क्षेत्रात एक कामगार म्हणुन उभे राहिले. पुणे शहर व डेक्कन परिसरात ते उत्कष्ट बाधकाम करणारे परिचीत झाले. त्यांच्या कामाची जाणीव महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या पर्यंत गेली. त्यांनी त्यांना कर्हाड येथे नेहले.
स्वातंत्र सेनानी शंकरराव धावडे एक स्वातंत्र सेनानी गोवा मुक्ती अंदोलनाच्या काळात क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या सह लढणारे समाज बांधव. मुंबई सह महाराष्ट्र झालाच पाहिजे या चळवळीतले म्होरके यासाठी अनेक वेळा तुरूंगात जावे लागले. कामगार व शेत मजुर यांच्या हाक्का साठी आयुष्यभर रस्त्यावर लढत राहिले. त्यातुन अनेक प्रश्न मार्गी लागले.
प. महाराष्ट्रातील डाव्या विचारसरणीचे एक लढवय्य नेते होते. समता, स्वातंत्र या विचार सरणीचे बांधव संपत्ती त्यांच्या उंबरठ्यावर आली होती. हुबळी येथील कै. काशिनाथ अंबाजी नांदगीरीकरांचे जावई. त्यांचे कुटुंबही तोलामोलाचे होते. पण या सर्वाकडे पाठ फिरवून, कामगार, शेतमजुर यांचे प्रश्न घेऊन ते रस्त्यावरची लढाई लढत होते. सामान्य माणसाची एक तळपती तलवार म्हणुन ते सर्वा बरोबर नव्हे तर सर्वा समोर.