याच मातीत जन्मलेले व पुणेकरांनी आपले म्हंटलेले श्री. हरिष सदाशिव देशमाने त्या काळातील पदवीधर. पुण्यात येऊन परस्थिती बरोबर दोन हात करीत कंपनीत नोकरी करू लागले. शालेय शिक्षण पुर्ण करित असताना उत्कृष्ट वक्ते प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या भाषणाचा मोठा प्रभाव पडला यातुनच त्या ओघवत्या अभ्यासपुर्ण भाषा प्रभाव पडला आणि ते काही काळात भोसले यांच्या भाषणा सारखे बोलु लागले.
हे मुळचे वाईचे ! यांनी 1922 मध्ये तेली समाचार पत्र काढले हे कार्य त्यांनी कै. रामचंद्र मेरूकर यांच्या प्रेरणेने केले. व तेली समाचार पत्र काढले. पश्चिम महाराष्ट्रातील तेली समाज बांधवांची 4 वेळा तेली समाजाची परिषद भरवली. समाजासाठी भरलेल्या या समाजसेवकाने पदरमोड करुन हे सर्व केले !
आज तेली समाजात सामाजिक व राजकिय जागृती दिसते त्याच्या मुळाशी तैलिक प्रबोधनकारांचे अथक प्रयत्न कारणीभुत आहेत. त्यांच्या कार्याचा फक्त परिचय करन घेणे एवढाच उद्देशय लेखाचा नाही, तर पदरमोड करन प्रसंगी आर्थिक झळ सोसुन त्यांनी सुरू ठेवलेल कार्य हे लाख मोलाचे होते, हे कार्य पोटार्थी नव्हते तर ती यज्ञात टाकतात तशी समिधा स्वरूपाची होती. नाही चिरा नाही पणती असे त्यांचे स्वरूप होते. त्यांच्या अतुलनिय कार्याची दखल घेऊन वंदन करणे हे प्रत्येक समाज बांधवाचे कर्तव्य आहे.
याच मातीतल श्री विक्रम नंदकुमार देशमाने हे सुद्धा परस्थितीला सामोरे जात पोलिस आयुक्त पदावर आहेत. आज ते महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी एक जबाबदार पोलिस आयुक्त म्हणुन कार्यकरीत आहेत. त्याच बरोबर याच मातीतले श्री. कैलास चंद्रकांत देशमाने व श्री. संदिप नारायण देशमाने हे आय.पी.एस. असुन पोलिस मुख्य कार्यालयात कार्यरथ आहेत.
या वेळी श्री. शंकर सारडा, शहिद डॉ. नरेंद्र दाभोळकर, बाबुराव घोरपडे, एन. जी. गायकवाड, कॉ. रणजीत किर्वे मान्यवर उपस्थीत होते. सायगावच्या मोहन देशमाने यांनी आपली नोकरी संभाळत मासिकाची मुळे खोलवर रूजवली. प्रबोधन रचना व संघर्षया माध्यमातुन समाज मन घडविण्यास हे मासिक आधारस्तभ ठरले आहे. गत 33 वर्षात वधुवरांना मोफत प्रसिद्ध दिली जाते