मोहन देशमाने,उपाध्यक्ष, ओबीसी सेवा संघ
ओबीसींचा विकास करावा या साठी मंडल आयोगाने 13 शिफारसी सादर केल्या त्यातील ओबीसींचा आर्थीक विकास ही एक बाब मंडलच्या शिफारशी शासनाने स्विकारल्या नंतर मंडल कोर्टत नेहणारे ब्राह्मण्य होते. या ब्राम्हण्याने तो कयदेशीर बाबत संपविण्याचा प्रयत्न केला तरी ओबीसी अर्थीक बाबत विकास ही बाब बचावली केंद्राचा व राज्याचा सहभागातून 4 टक्के दराने कर्ज वाटप. ओबीसींचे पारंपारीक धंदे, ओबीसींच्या कलाकुसरीची परंपरा त्याच्यातील सुशीक्षीतांसाठी उद्योग धंदे यासाठी महामंडळ तयार केले. वाजत गाजत ढोल बडवत भाजपा व सेना शासनाच्या काळात महाराष्ट्रात 18 वर्षा पुर्वी हे महामंडळ स्थापन झाले.
मोहन देशमाने,उपाध्यक्ष, ओबीसी सेवा संघ
या भाजपाने कमंडलने मंडल गाडण्यासाठी मोदी प्रोजेक्ट केले. मोदींना पुढे करताना विकासाचा चेहरा जेवढा त्यांचा होता. त्या पेक्षा त्याचा ओबीसी जन्म महत्वाचा होता. कारण क्षत्रिय जातीत गुंतुन पडलेल्या त्या जाती पासुन त्रासलेल्या समाजांना आपला आधार वाटला हा भ्रमाचा भोपळा आज फुटू लागला. कारण देशात जाट, मराठा, पटेल या जातींनी मंडलला प्रखर विरोध केला. आज हेच समाज दांडगाईने ओबीसीं बनु पहातात.
मोहन देशमाने,उपाध्यक्ष, ओबीसी सेवा संघ
ब्राह्मण्य जपणार्या संघटनांनी आपला एक अजंठा स्वातंत्र्या पुर्वी तयार केला आहे. स्वातंत्र्य मिळणार ही काळ्या दगडावरची रेघ होती. हे आसले स्वातंत्र्य त्यांना कधीच मान्य नाही. सर्व सामान्यांना स्वातंत्र याचे अधीकार असणे हेच मुळात मान्य नाही स्वातंत्र्याचे सर्व फायदे व कायदे यांचा वापर करून विकास साधत असताना ही मंडळी या देशाची घटनाच मान्य करत नाहीत. त्यांनी मंडलला कोपर्यात ठेवण्यासाठी कमंडल फिरवले. ओबीसी हा देशाचा राज्यकर्ते नसु नये यासाठी जाणीव पुर्वक अजपर्यंत त्यांनी प्रयत्न केले.
मोहन देशमाने,उपाध्यक्ष, ओबीसी सेवा संघ
परवा झालेल्या ग्रा. प. निवडणूकीत खरा ओबीसी उंबर्या आड लपुन बसण्यात समाधान मानु लागला. गावचा पाटील, गावचा देशमुख ओबीसी म्हणुन निवडणूकीस उभा राहिला त्याने आपल्या जातीच्या, पैशाच्या बळावर अक्षरशहा खर्या ओबीसींचा पालापाचोळा केला.
मोहन देशमाने,उपाध्यक्ष, ओबीसी सेवा संघ
कारण स्वातंत्र्याची सर्व सत्तास्थाने जवळ असताना फक्त आणि फक्त आपला व आपल्या सग्या सोयर्यांचा विकास करणारे जवळ जवळ महाराष्ट्रात शेकडो मराठा घराणी आहेत. राजकीय सत्ता, सहकार, शैक्षणिक संस्था याच सामाजाच्या ताब्यात आहेत. लाखो रूपये घेऊन शैक्षणिक प्रवेश देऊन शिक्षण सम्राट झोलेल्या या मराठा सम्राटांनी आपल्या किती गरिब मराठ्यांना मोफत शिक्षण दिले ? सहकार प्रणली या मराठा मंडळीच्या ताब्यात. सहकार वाढवावा तो उद्धार कर्ता व्हावा यासाठी आजपर्यंत मोजता येणार नाही इतका निधी शासनाचा ओतला तरी सहकार संपू लागला. अनेक साखर कारखाने, अनेक सहकारी उद्योग दिवाळे वाजवू लागले यातला पैसा गरिब मराठ्यांना का देऊ केला नाही.