Sant Santaji Maharaj Jagnade
याच मातीतल श्री विक्रम नंदकुमार देशमाने हे सुद्धा परस्थितीला सामोरे जात पोलिस आयुक्त पदावर आहेत. आज ते महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी एक जबाबदार पोलिस आयुक्त म्हणुन कार्यकरीत आहेत. त्याच बरोबर याच मातीतले श्री. कैलास चंद्रकांत देशमाने व श्री. संदिप नारायण देशमाने हे आय.पी.एस. असुन पोलिस मुख्य कार्यालयात कार्यरथ आहेत.
या वेळी श्री. शंकर सारडा, शहिद डॉ. नरेंद्र दाभोळकर, बाबुराव घोरपडे, एन. जी. गायकवाड, कॉ. रणजीत किर्वे मान्यवर उपस्थीत होते. सायगावच्या मोहन देशमाने यांनी आपली नोकरी संभाळत मासिकाची मुळे खोलवर रूजवली. प्रबोधन रचना व संघर्षया माध्यमातुन समाज मन घडविण्यास हे मासिक आधारस्तभ ठरले आहे. गत 33 वर्षात वधुवरांना मोफत प्रसिद्ध दिली जाते
सातारा जिल्ह्यातील सायगांव एक छोटे गाव. तेलघाना ही या बाधवांची परंपरा तेल घाण्याला मावळत बाजु होती. तो घाणा ही मावळु लागला भुसार माल खरेदी विक्री मुळ धरता धरता कोमजु लागली. आणि जगण्याच्या धडपडी साठी काही जन गाव सोडु लागले. त्या पैकी श्री. बी. पी देशमाने हे शासकीय नोकरी निमित्त बाहेर पडले.
शिरवळ या मुळ गावातुन ते लोणी कळभोर येथे स्थिर झाले. फिलिफ्स कंपनीत नोकरी करु लागले. तसा यांचा पिंड चळवळी स्वभाव धाडसी त्यामुुळे ते फिलिफ्स कामगार संघटनेचे अध्यक्ष झाले. कामगार हा त्यांचा पिंड जवळून पहाता आला. या कंपनीत अनेक समाज बांधवांना त्यांनी कामास लावले होते. कामगारांच्या हिता साठी त्यांनी संप पुकारला. संप लांबत चालला होता व्यवस्थापन मागण्या मंजुर करेणा.
या समाजाचा तेल बिया गाळप हा परंपरेचा व्यवसाय. तेल बी खरेदी गाळप उत्पादक माल विक्री. व्यवस्था तशी व्यापारी वृत्तीची या समाजात असे ही काही बांधव होऊन गेल की त्यांनी पिड्यान पिड्या मोठा व्यवसाय करणार्या किंवा व्यवसायाचे शंभर टक्के आरक्षण असलेल्या व्यपार्यांनाही मागे सारले. ही किमया कोरेगाव येथिल कै. काशिनाथ तुकाराम विरकर यांना साध्य झालेली होती.