पौड :- या तालुक्याच्या गावच्या ठिकाणी पुर्वी पासुन समाजाचा सत्तेत सहभाग आहे. सरपंच, पाटीलकी, जि. प. सदस्य, पं. स. सदस्य समाजाचेच आहेत. परवा झालेल्या ग्रा. पं. निवडणीकीत समाजाचे तिन सदस्य विजयी झाले आहेत. नुकत्याच झालेल्या सरपंच व उपसरपंच निवडणुकीत समाज बांधव श्री वाल्हेकर हे विजय झाले आहेत. त्यांचे अभिनंदन पौंड समाज बांधवा तर्फे केले आहे. सर्वा तर्फे पुन्हा अभिनदन.
नसरापुर - येथील ग्रामपंचायत निवडणुकीत डॉ. गणेश हिवरेकर निवडून आले होत. या वेळी सरपंच पद ओ.बी.सी. राखीव असल्याने त पदाचे हाक्कदार होते. त्यामुळे सरपंच पदाच्या निवडणुकीत ते विजयी ही झाले. तेली समाजाचे सरपंच असने ही या गावची परंपरा खंडीत झाली होती ती त्यांनी पुन्हा सुरु केली. डॉ. गणेश यांच वडील कै. वामनराव हिवरेकर यांनी बरेच वर्ष सरपंच भुषवले आहे. त्यांच्या निवडीबद्दल श्री. प्रकाश कर्डीले माजी अध्यक्ष तिळवण तेली समाज पुणे यांनी अभिनंदन केले आहे. सर्वातर्फे अभिनंदन.
महापुरुषांना रक्ताचे नव्हे विचारांचे वारस असतात,पण आज उभा महाराष्ट्र म्हणतोय ज्ञानेश महाराव सर, जितेंद्र आव्हाड साहेब,श्रीमंत कोकाटे सर,प्रतिमाताई परदेशी तुम्हीच आहात महापुरुषांच्या रक्ताचे आणि विचारांचे खरे वारसदार, तुम्ही पेटवलेली ही विचारांची मशाल आता वणवा बनून पेटल्याशिवाय राहणार नाही,महाराष्ट्र तुमचे उपकार कधीच विसरणार नाही...
पुणे :- तिळवण तेली समाजा तर्फे 15 ऑगष्टचे ओचित्य साधुन समाज बांधवांचा सत्कार सामारंभ आयोजित केला होता. सत्काराला उत्तर देताना पोलीस आयुक्त संजय पाटील आपल्या भाषणात म्हणाले, जळगाव जिल्ह्यातील आमच्या गावची पाटीलकी ही पुर्वी पासुन आहे. मी जेथे जथे नोकरी निमित्त होतो तेथे समाजाचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत राहुन सोडवले आहेत. कुणाला अडचन असेल मार्गदर्शन हवे असेल तर जरूर भेटा मी सहकार्य करेल. कारण पुणे समाजाच्या कामाची परंपरा आहे. समाजाचे काम महाराष्ट्रात अग्रेसर आहे.
याप्रसंगी जाणिव पुरस्कार विजते प्रा. वसंतराव कर्डीले म्हणाले की, भारतात 6500 जाती असल्या तरी सर्व जातीचा ओबीसी हा कणा आहे . पुर्वी त्याची संख्या 52 % होती. आज ती 65 % च्या पुढे आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसी सत्ताधारी होऊ शकतात. मात्र त्यांच्यात एकजुट नाही. तसेच राजकीय जागृती नाही. 1902 मध्ये छत्रपती शाहु महाराजांनी ओबीसीसाठी 50 टक्के प्रथम आरक्षण दिले. 1928 साली सायमन कमिशनपुढे श्येडुल्ड कास्टची यादी आंबेडकरांनी दिली तर श्येडुल्ड कास्टची यादी ठक्कर बाप्पांनी दिली.