पण लक्षात राहते श्रीमती धोत्रे यांचे भविष्याचे वेध घेणारे कार्य. सोहळ्यास लोटणार्या जनलसमुदायाचे जेवण बनविण्यास भांडीच नव्हती. ती जवळ जवळ सुरूवातीस देण्याचे काम यांनी केले. याचबरोबर पालखी सोहळ्याचा इतिहास हा असाच संपेल. हे महान कार्य करणारी जी जी माणसे होती. ती ती माणसे अंधारात राहू नयेत अशी इच्छा हा सोहळा सुरू झाल्यापासून होती. तो इतिहास जपला जावा यासाठी ४ ते ५ हजार खर्च करून हा इतिहास छापील केला.
मग सर्व एकत्र आले. पालखी सुरूवात करणे जेवढे कष्टाचे होते तेवढेच, नव्हे जास्तच, त्याचे सातत्य टिकविणे अवघड होते. या अवघडपणावर चर्चा झाली. कार्यातले दोष झिडकारून सोहळा निर्दोष करण्यावर विचारविनिमय झाला. प्रत्येक वर्षी पालखीला भरीव स्वरूप येऊ लागले. तेव्हा पालखीसोहळ्याची पहिली कार्यकारीणी तयार केली.
धोंडिबा राऊत व दादा भगत यांचा आनंद गगनात मावत नव्हता. या पांडुरंगाच्या भेटीसाठी किती दिव्य केले. त्या दिव्याचे जे फळ आले ते फळ पाहुन त्यांना जसा आनंद होत होता तसेच पालखीबरोबर आलेले व इतर गोळा झालेले हरिभक्त आनंदी झाले होते.
माऊलीबरोबर जाणार्या लाखो माणसांचा समुद्र. त्यांना पोटभर जेवण देण्याचे काम हे अर्जुनशेठ करीत. हा लैकिक अनेक वर्षांचा. पालखी निघणार ही गोष्ट दादा भगतांच्या करवी समजली होती. पालखी मावळातून आणण्यास त्यांनीच टेम्पो दिला होता. आणि कार्यकर्त्यांना आशीर्वादही. पालखी बरडला येणार हा आनंद त्यांच्या चेहर्यावर मावत नव्हता
पालखी वाल्ह्याच्या मार्गाला लागली. वाल्हे या ठिकाणचे पवार व इतर समाजबांधव स्वागताला गावाबाहेर उभेच होते. स्वागत व पूजन केले. संध्याकाळी दमलेल्या बांधवांना जेवण दिले. सकाळी गरम पाणी आंघोळीला दिले. चहापाणी झाल्यावर विश्वनाथ सोपान, विष्णु, सुरेश यांनी पालखी शिवराम पवार यांच्या घरी आणली दत्तात्रय तुकाराम पवार इ. मंडळींनी पालखी गाव वेशीपर्यंत नेली या मुक्कामात पुन्हा चार वारकरी आमच्यात आले.