सदर कार्यक्रमाची सुरवात श्री संताजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली या कार्यकमाच प्रमुख पाहुणे मंबई हायकार्टाचे वकील अॅड. विपीन कामडी हजर होते. तसेच सहाय्यक पुरवठा अधिकारी सौ. रोहणीताई शिंदे, पी.एस.आय. शिंदे मॅडम नगरसेविका सौ. आश्विनीताई जाधव नगरसेवक श्री. गोपाळजी तिवारी, अभयजी छाजेड, प्रियाताई महिंद्रे, संताजी प्रतिष्ठाणचे कोथरुड अध्यक्ष श्री. रत्नाकर दळवी डॉ. मयुर क्षीरसागर इ. मान्यवर हजर होते.
चिंचवड :- ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र या बिगर राजकीय संघटने तर्फे हे साहित्य संमेलन 4 ऑक्टोबर 2015 रोजी सकाळी 9.30 ते सायं 7 वाजेपर्यंत चैतन्य सभागृह चिंचवड येथे संपन्न होईल. ओबीसी समाजाचा संस्कृतीक शोध, ओबीसींवर होणारा अन्याय या बाबत विचार प्रकट केले जातिल.
पौड :- या तालुक्याच्या गावच्या ठिकाणी पुर्वी पासुन समाजाचा सत्तेत सहभाग आहे. सरपंच, पाटीलकी, जि. प. सदस्य, पं. स. सदस्य समाजाचेच आहेत. परवा झालेल्या ग्रा. पं. निवडणीकीत समाजाचे तिन सदस्य विजयी झाले आहेत. नुकत्याच झालेल्या सरपंच व उपसरपंच निवडणुकीत समाज बांधव श्री वाल्हेकर हे विजय झाले आहेत. त्यांचे अभिनंदन पौंड समाज बांधवा तर्फे केले आहे. सर्वा तर्फे पुन्हा अभिनदन.
नसरापुर - येथील ग्रामपंचायत निवडणुकीत डॉ. गणेश हिवरेकर निवडून आले होत. या वेळी सरपंच पद ओ.बी.सी. राखीव असल्याने त पदाचे हाक्कदार होते. त्यामुळे सरपंच पदाच्या निवडणुकीत ते विजयी ही झाले. तेली समाजाचे सरपंच असने ही या गावची परंपरा खंडीत झाली होती ती त्यांनी पुन्हा सुरु केली. डॉ. गणेश यांच वडील कै. वामनराव हिवरेकर यांनी बरेच वर्ष सरपंच भुषवले आहे. त्यांच्या निवडीबद्दल श्री. प्रकाश कर्डीले माजी अध्यक्ष तिळवण तेली समाज पुणे यांनी अभिनंदन केले आहे. सर्वातर्फे अभिनंदन.
महापुरुषांना रक्ताचे नव्हे विचारांचे वारस असतात,पण आज उभा महाराष्ट्र म्हणतोय ज्ञानेश महाराव सर, जितेंद्र आव्हाड साहेब,श्रीमंत कोकाटे सर,प्रतिमाताई परदेशी तुम्हीच आहात महापुरुषांच्या रक्ताचे आणि विचारांचे खरे वारसदार, तुम्ही पेटवलेली ही विचारांची मशाल आता वणवा बनून पेटल्याशिवाय राहणार नाही,महाराष्ट्र तुमचे उपकार कधीच विसरणार नाही...