ते एवढ्यावर स्थीर राहिले नाहीतर वाडा गावच्या ग्रामपंचायतीचे सलग दहा वर्ष ग्रा. पं. सदस्य ही राहिले आहे. भिमा शंकर गणेश मंडळाचे ते खजिनदार म्हणुन कार्यरथ आहेत. भिमा शंकर ग्रा. वि. स. पत संस्थेचे संचालक म्हणुन गावाचा विकास साध्य करित आहेत. खेड येथील जेष्ठ बांधव श्री. सत्यवान शेठ कहाणे, श्री. प्रदिप कर्पे, श्री. अनिल कहाणे यांच्या संपर्कात राहिल्या मुळे एक वेगळी विचाराची बैठक तयार झालेली. खेड तालुका तेली महासभा, पुणे जिल्हा पश्चिम तेली महासभा या संघटनेच्या उभारणीच्या कामात सहभाग यातुन सामाजीक जाणीव बळावत गेलेली.
आई भल्या पहाटे उठुन भाकरी तयार करून फडक्यात बांधुन एसटीने पाठवुन देत आसे. तो डबा घेऊन येत आसत. सकाळी तोच डबा रात्री सकाळचे शिळे खाऊन गाडीत झोपत आसत. या अवस्थेत गॅरेज मधील कामाचा पुर्ण अनुभव घेतला. हाताला कला आली. याच कलेच्या जोरावर टाटा टेल्को, बजाज टेम्पो, बजाज ऑटो, भारत फोर्ज, सिपोरेक्स (बी.जी. शिर्के) या मध्ये मॅकॉनिक म्हणुन थोडे थोडे दिवस काम केले.
कै. भीकुशेठ खळदकर एक सुजान व्यक्तीमत्व होते. श्रीकृष्ण या दैवत्वावर अढळ निष्ठा होती चक्रधरांच्या वचनांशी ते बांधील होते. यातुनच त्यांनी संसाराकडे पाठ करन चक्रधर मंदिराचा जिर्णेद्धार केला. या साठी स्थानीक बांधवांचा सहभाग व त्याग घेऊन ते गावो गावी फिरावयास गेले. आशा श्रद्धा स्थानाचे उद्घाटन त्यांनी 1987 मध्ये केले. उद्घाटना नंतर 1990 ला ते वारले पण आदर्शाचा ठेवा ठेऊन गेले. श्री. सुर्यकांत यांनी तो जपला, जोपासला व वाढविला सुद्धा श्री. सर्यकांत शेठ हे तिळवण तेली समाज कडुसचे अध्यक्ष सामाजीक प्रश्ना साठी सावध
सदर कार्यक्रमाची सुरवात श्री संताजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली या कार्यकमाच प्रमुख पाहुणे मंबई हायकार्टाचे वकील अॅड. विपीन कामडी हजर होते. तसेच सहाय्यक पुरवठा अधिकारी सौ. रोहणीताई शिंदे, पी.एस.आय. शिंदे मॅडम नगरसेविका सौ. आश्विनीताई जाधव नगरसेवक श्री. गोपाळजी तिवारी, अभयजी छाजेड, प्रियाताई महिंद्रे, संताजी प्रतिष्ठाणचे कोथरुड अध्यक्ष श्री. रत्नाकर दळवी डॉ. मयुर क्षीरसागर इ. मान्यवर हजर होते.
चिंचवड :- ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र या बिगर राजकीय संघटने तर्फे हे साहित्य संमेलन 4 ऑक्टोबर 2015 रोजी सकाळी 9.30 ते सायं 7 वाजेपर्यंत चैतन्य सभागृह चिंचवड येथे संपन्न होईल. ओबीसी समाजाचा संस्कृतीक शोध, ओबीसींवर होणारा अन्याय या बाबत विचार प्रकट केले जातिल.