Sant Santaji Maharaj Jagnade

तसेच मा. श्री. शरदराव पवार व श्री अजित पवार यांचे कडे समाजाचे प्रश्न मांडले मा. जी मुख्यमंत्री विलासराव देशमुख उतसेच माजी मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण साहेब यांना तेली समाजास राजकीय न्याय मिळावा म्हणुन प्रत्यक्ष भेटून निवेदन देऊन श्री. प्रकाश पवार यांनी आपले म्हणणं मांडले. समाजातील पति पत्नी मधील वैवाहिक वाद सांमज्यंस पणे मिटवले तसेच समाज बांधवांना वैयक्तिक आर्थिक तसेच इतर मदत करणे. उच्च शिक्षीत वधु-वर मेळावे घेणे.
पुण्या लगतच्या बहुले गावातले व्यवसायामुळे कोथरूड येथे स्थाईक झाले. पुण्यात जे परिवर्तन झाले त्या निवडणूकीत निवडून आले. मोडकळीस आलेली वास्तु न्रतनीकरण करणे भव्य दिव्य वधु-वर मेळावा घेणे. बरेच जे भाडेकरू होते ते सहज बाहेर जात नव्हते या साठी सर्व विश्वस्ता बरोबर उभे राहिले व यात यश मिळवले.
श्री. संत संताजी पालखी सोहळा सुरू होताच अंबिके कुटूंब त्यात सामील झाले. आगदी सुरूवातीस पाच जण सामील होते पालखी सोहळा लोक हातच्या बोटावर मोजता येण्या एवढे अंबिके कुटूंबीयांना ते पहावले नाही. डेक्कन वरून पालखी अलका चौकात येताच हे कुंटूंब समोर गेले. या महान संताना बर्फाच्या गाडीवर बसवून आनले हे पहावले नाही. पालखी सुद्धा जुनी व उसनवारी ची होती ही खंत स्वस्त बसु देत नव्हती अंबिकेंनी या साठी शाळा सोबत सुरू केली. याना वेडे आहेत म्हणनारे बरेच होते. पण हा नवा इतिहास घडवूया म्हणनारो जे थोडे होते त्यातील हे एक यातूनच पहिली पालखी बनवून दिली व श्री संत संताजींना योग्य स्थान दिले गेले.
कोथरूड येथे सुरूवातीला श्री. संताजी जगनाडे महाराज तिळवण तेली समाज ट्रस्ट म्हणुन १९९३ मध्ये स्थापन करण्यात आला. या ट्रस्टची स्थापना होण्यापुर्वी सन १९९२ मध्ये तिळवण तेली समाज, ८२ भवानी पेठ येथील निवडणूक जाहीर झाली होती. त्यावेळी मी व श्री विजय भोज आम्हा दोघांना काही ट्रस्टींनी १९८६ ची मतदार यादी देऊन या भागातील समाजबांधवांना मतदनासाठी कार्यालयात येण्याचे सांगितले. त्यानुसारर मी आणि श्री. विजय भोज आम्ही दोघांनी मतदार यादीनुसार येथील प्रत्येक समाजबांधवाकडे जावुन मतदानासाठी कार्यालयात येणाचे आवाहन केले. परंतु मतदानासाठी आलेल्या समाजबांधवांनी कार्यालयात येऊन मतदार यादीत आपले नाव शोधले असतार एकाही समाजबांधवाचे नाव यादीत आढळले नाही.
८२ भवानी पेठ पुणे व २८६ मंगळवार पेेठ य दोन वास्तु समाजास दान केल्या ते कै. अप्पासाहेब भुजंगराव भगत, स्वातंत्र्य पुर्वकाळातील पुणे नगरपालिकेचे नगराध्यक्ष कै. केशवराव अप्पासाहेब भगत, तिळवण तेली समाजाचे अध्यक्ष कै. रत्नाकरदादा भगत कै. विश्वनाथ भगत व श्री. रामचंद्र भगत यांचा वारसा परंपरेनुसार सुरू ठेवून सन २००२ ते सन २०१५ पर्संत विश्वस्त पदावर राहण्याचा मिळालेला मान अभिमानास्पद आहे. समाज बंधु भगिनींनो आपण सर्वाच्या सहकार्याने तिळवण तेली समजा पुणे ८२ भवानी पेठ पुणे २ या संस्थेचे सामाजिक कार्य करीत असताना २५ वर्षांपासुन सुरू असलेला वधुवर परिचय मेळाव्यात यशस्वी करण्यात सक्रिय सहभाग राहिलेला आहे.