Sant Santaji Maharaj Jagnade
पुण्याचे जुने जाणते बांधव कै. बाबुराव करपे यांच्या सुन सौ. निता करपे. या संगमनेर जि. नगर येथील श्री. सुरेश बाबुराव रहातेकर यांच्या कन्या श्री. रहातेकर संगमनेर नगर पालीकेचे १५ वर्ष नगर सेवक होते. निता यांना समाज सेवेचे बाळकडु लहानपणीच मिळाले. कै. बाबुराव करपे घराण्यात आल्या. येथेही त्या सममाज कार्यात मग्न झाल्या. कै. बाबुराव करपे हे एक जाणते व प्रतिष्ठीत बांधव होते.
सदरच्या संस्थेतील शिस्तबद्ध कामाचे नियोजन तसेच पदाधिकार्यांची सामाजासाठी असलेली आपुलकी सर्व घटकांना एकत्र आणण्याची प्रवृत्ती व समाजाचे जीवनमान कशा प्रकारे उन्नत करता येईल या बाबींची तळमळ मला जाणवली मी सुद्धा एक कार्यकर्ता म्हणून या संस्थेत कार्यरत असलो तरी घेण्यात येणारे निर्णय हे सर्वानुमते घेतले जातात ही बाब उल्लेखनिय आहे.
संताजी फांऊंडेशन पुणे, ही तेली समाजातील एक सामाजिक जाणिव असलेली संस्था आहे. या संस्थेची स्थापना झाल्या पासून आजपर्यंत या संस्थेमध्ये मी काम करत आहे. संस्थेचे संस्थापक सदस्य श्री. प्रकाशशेठ पवार यांच्या योग्य मार्गदर्शना खाली संस्थेचे कामकाज अतिशय सुरळीत पणे चालु आहे. संताजी फाऊंडेशन ही संस्था कोणत्याही प्रकारच आर्थिक सहाय्य न घेता स्वखर्चांने उच्चशिक्षितांचे वधु-वर मेळावे वर्षातून दोन वेळा आयोजित करते.
याच व्हावळ घराण्यातील कै. मुरलीधर व्हावळ पुणे कॉम्प परिसरातील देश स्वातंत्र्यासाठी उभा पेटला असताना त्यांनी स्वातंत्र्याच्या लढाईत सहभाग घेतला. कॉम्प मध्ये परदेशी माल ट्रकने येत आसे तो माल दुकानात विक्रीस जात आसे कै. व्हावळ यांनी तो माल भोपळे चौकात जमा केला आणि परदेशी मालाची जाहीर होळी केली. १९४२ च्या शेवटच्या पर्वात ते भुमीगत राहून इंग्रजांना पिटाळून लावण्या साठी प्रयत्नशिल होते.
सर्वच विश्वस्त आसतात मुळात ही संस्था रजीस्टर नाही व रजीस्टर केली जाणार नाही. पावती नाही पैसे मागने नाही. ही वाटचाल वेगळी व आदर्श युक्त आहे. सदर कार्य काल सातत्याने परिपुर्ण व्हावा या साठी सर्वश्री रोहिदास हाडके, पाडुंरंग चव्हाण, हरिष देशमाने, विष्णू चव्हाण प्रकाश कोकणे, सुरेंद्र राऊत यांचा विशेष सहभाग आसतो.