कोथरूड येथील शुभेच्छा मंगल कार्यालयात श्री संताजी प्रतिष्ठान, कोथरूडच्या वतीने नुकताच तिळगुळ व हळदी-कुंकू तसेच विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ पार पडला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते २०१५ दिनदर्शिकेचे प्रकाशनही करण्यात आले. संस्थेच्या वतीने वर्षभर विविध समाजिक उपक्रम राबविले जाता.
आशा जागृत तालुक्याची जबाबदारी श्री. ज्ञानेश्वर दुर्गुडे श्री. किसनराव अवसरे, बळीराम धोत्रे यांच्याकडे आली. श्री. दुर्गुडे यांनी तालुक्यातील परंपरेला साजेसे कार्य सुरू केले. सलग दोन वर्ष विद्यार्थी गुण गौरप समारंभ घेऊन संघटन जिव्हाळा निर्माण केला. या बळावर ते खाने समुरी करू लागले.
सत्यवान शेठ कहाणे हे एक वयाची ७५ वर्षांची वाटचाल पुर्ण करणारे घरातील कै. वसंतराव, श्री. शशीकांत, श्री. मुरलीधर यांना बरोबर घेऊन उद्योगात उभे राहिले. भुसार माल ठोक व करकोळ विक्री करू लागले यातुन ऑईल मिल व इतर व्यवसायात आपला ठसा उमटवला. संघटन, समाज सेवा, त्याग कमावर निष्ठा ही आपली विचार ठेवण निर्माण केलेले बांधव, मंडल आयोगाची राखीव जागा मिळण्याच्या कामा पुर्वी ते खेडगावच्या ग्रामपंचायत सदस्यपदी निवडूण गेले. सामान्य माणसासाठी धडपडणे, त्यांचे प्रश्न सोडवणे त्या साठी प्रसंगी संघर्ष करणे ही प्रणाली वापरली त्यातुन आपला ठसा उमटवला यामुळे खेड तालुक्यातील राजकीय क्षेत्रात आदराचे स्थान निर्माण झाले. या मुळे ओबीसी असुनही राजकीय मडळींना त्यांची नोंद घ्यावी लागली. यातुनच पुणे जिल्हा परिषदेवर स्विकृत सदस्य म्हणुन निवड झाली. खेड व इतर जिल्हा तालुक्यांच्या आर्थिक विकासाची बांधीलकी स्विकारून उभ्या राहिलेल्या राजगुरनगर सहकारी बँकेत ते संचालक म्हणुन निवडून आले या बँके द्वारे गरजुनां व प्रामाणीक खातेदारांना सहकार्याचा केंद्र बिंदु त्यांनी मांडला त्यामुळे ते या बँकेच व्हाईस चेअरमन ही काही वर्ष होते. निष्ठा त्याग व धडपड जवळ असल्याने हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या डायरेक्टर बोर्डावर ही ते काम करीत होते.
मुंबई :- बृहन्मुंबई तिळवण तेली समाज, मुंबई या उपरोक्त संस्थेच्या वतीने भव्य वधु-वर पालक परिचय मेळावा रविवार दिनांक २२ फेब्रु २०१५ रोजी दुपारी १.०० वा. म्युनिसिपल स्कुल सभागृह ना. म. जोशी. मार्ग, डिलाईल रोड, मुंबई - ४०००११ येथे आयोजित करण्यात आला.
समाजातील गोरगरीब जनतेसाठी काम करणारा, त्यांना आपले म्हणुन समाजात काम करणारा समाजसेवक यांची समाजाला गरज आहे. समाजात अनेक संघटना काम करतात परंतु समाजाची गरज ओळखुन कार्य करणे गरजेचे आहे. केवळ प्रसिद्धीसाठी कार्य न करता समाजातील गरजु घटक केंद्र बिंदु माणून कार्य करणे गरजेचे आहे.