तेली समाजाचे खास पदार्थ
कारळी चटणी
काळे तीळ बैलाने फिरवलेल्या घाणीत घालून चांगला भुगा करून घ्याव अथवा भुुगा करून घ्यावा. त्यात काळ्या तिळाचेच तेल व तिखट व मिठ घालावे. पापड भाजुन घ्यावेत व त्याचा चुरा करून तो त्यात् टाकवा. अशा रितीनेकारळी चटणी तयार होईल ही चटणी आरोग्यास अंत्यंत पोष्टीक आसते.
आनारसे
तेली समाज हा शिवास सर्वात जास्त मानतात. त्यामुळे आज ही आनेक ठिकाणी सोमवारी तेल घाणा बंद आसतो. तेल घाण्यास शिवाचे आवातार ही मानले जाते. दसर्याला घाण्याची यथासांग पूजा करून त्यास नैवेद्य दाखविला जातो, तो आनारश्यांचा.
साहित्य :- जुने तांदूळ (चिकट तांदूळ वर्ज्य), कोल्हापूरी पिवळा गूळ, तूप, खसखस साखर,
कृती : तांदूळ स्वच्छ धुऊन भिजत घालावेल, दररोज पाणी बदलून तांदूळ 3 दिवस भिजत ठेवावे. नंतर ते उपसून पाणी निथळून काढावे तांदूळ दमट असतानाच ते कुटून अगर मिक्सरमधुन त्याचे खुप बारीक पिठ करावे. जेवढ पिठ आसेल तेवढाचाच वजनाचा गुळ बारीक किसुन घ्यावापीठ व गुळ निट एकजिव करावा व त्यात दोन चमचे साजुकतुप घालावे. हे पिठ डब्यात बंद करून ठेवावे. साधारणता आठ दिवसा नंतर हे पिठ आनरसे बनवण्यास योग्य होते.
तेली समाजातील व्यक्तीमत्वे डॉ. महेंद्र धावडे (एम.ए.बी.एड., पी.एच.डी.)
हे तेली समाजाचे गाढे संशोधक, तेली समाज : इतिहास व संस्कृती या विषयावर डॉक्टरे मिळवली याशिवाय त्या समाजावर सशोनात्मक अनेक गंथ लिहिले. त्यातील प्रमुख गुप्ता बिलाँग टू तेली कम्युनिटी, कॉन्ट्रीबिशन ऑफ तेली कम्युनटी टू बुद्धीझम, व्हॉट काँग्रेस अॅण्ड बीजेपी हॅव डन फॉर ओबीसी ? आदि सांप्रत कार्यकारी संपादक : उपराधानी साप्ताहिक, नागपुर, सहसंपादक : साहू वैश्य महासभा, दिल्ली राजर्षी शाहू महाराज पुरस्कार, राठोड तेली सन्मान प्राप्त.