संत नामदेवा नंतर महाराष्ट्रात सामाजिक, धार्मिक, राजकीय बाबत अन्यायाची आवस्था होती. खर्या अर्थाने धर्माला ग्लानी आली होती. आशा वेळी संत तुकारामांच्या नेतृत्वा खाली शेकडो वर्षांची दडपशाही झटकून इतिहास निर्माण करण्याचे कार्य झाले. यामुळे पुढे शेकडो वर्ष जे राजकीय, सामाजिक, धार्मिक परिवर्तन धडले त्याचे शिल्पकार संत संताजी जगनाडे आहेत ते संत तुकारामांचे शिष्य, लेखनिक या त्यांच्या भुमिके पेक्षा धार्मिक व सामाजीक परिर्वतनातील लढाईतले ते एक सर सेनापती होते. हा अभिमान, हि साठवण ही आठवण हे स्फर्ती ठिकाण, ही मानवता तमाम मानव जातीची आहे. आणि याची जाणीव केंद्र शासना, राज्य शासन यांनी ठेवली, ठेवतात व ठेवावी ही लागेल म्हणुन ही तुम्हा आम्हा सर्व तेली समाज बांधवांची कार्यर्त्याची भुमीका आहे. ती आपण पार पाडतो ही पण आज मी या विचार प्रक्रिये द्वारे काही नम्र पणे विचार मांडतोय. या विचार प्रक्रियेतुन आपण मिळुन सारे श्री संताजी समाधी स्थळ भव्य करूया.
परंतु याच शहरात श्री. धोंडीराम शेठ सायकर यांच्या मार्गदर्शाना खाली फक्त १० रूपयात वधु-वर मेळावा ही संकल्पना रावबली होती. यातून शेकडो, लग्न जमली त्या पेक्षा समाज एकत्र येऊ लागला. एकत्र आलेल्या समाजाला भरीव संघटनेची गरज होती. कार्यकर्ते एकत्र येत होते. भव्य दिव्य कार्यकरता करता विचारात ताळ मेळ जमत नव्हता. एकमेकात गुंते वाढविण्यापेक्षा आपल्याला जे करावयाचे आहे या साठी सर्वश्री प्रदिप सायकर, डॉ. गणेश अंबिके, नरेंद्र मेहर, विष्णूपंत ढंगाळे, सुनिल देशमाने, आणेकर, डी. डी. चौधरी मंडळी एकत्र आली. यातुनच संताजी सेवा प्रतिष्ठाण पिंपरी चिंचवड या संस्थेची सुरूवात केली. सेवा, त्याग व निष्ठा या बळावर संस्थेने आपली उद्दिष्टे मानली. या परिसरात सर्व कामगार वर्ग. रोजची मेहनत करून घर चालवणारी जवळ जवळ सर्व जन उद्योजक, व्यापारी मंडळी फार थोडी. त्यांचे पाठबळ, मार्गदर्शन, सहभाग या बळावर सात वर्षा पुर्वी पहिला मेळावा संपन्न झाला. यातूनच एक उमेद मिळाली. महाराष्ट्र तेली महा सभा अंतर्गत संताजी सेवा प्रतिष्ठान संचालित कार्य झाले. गत सात वर्ष ही वाटचाल यशस्वी झाली.