Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

तेली समाजाचे खास पदार्थ

आनारसे 

      तेली  समाज हा शिवास  सर्वात  जास्त  मानतात.  त्यामुळे आज  ही  आनेक  ठिकाणी सोमवारी  तेल घाणा बंद  आसतो. तेल घाण्यास शिवाचे  आवातार ही मानले जाते. दसर्‍याला घाण्याची यथासांग पूजा करून त्यास नैवेद्य दाखविला जातो, तो आनारश्यांचा.
    
    साहित्य :- जुने तांदूळ (चिकट तांदूळ वर्ज्य), कोल्हापूरी पिवळा गूळ, तूप, खसखस साखर,

    कृती : तांदूळ स्वच्छ धुऊन भिजत घालावेल, दररोज पाणी बदलून तांदूळ 3 दिवस भिजत ठेवावे. नंतर ते उपसून पाणी निथळून काढावे तांदूळ दमट असतानाच ते कुटून अगर मिक्सरमधुन त्याचे खुप बारीक पिठ करावे. जेवढ  पिठ आसेल तेवढाचाच वजनाचा गुळ बारीक किसुन घ्यावापीठ व गुळ निट एकजिव करावा व त्यात दोन चमचे साजुकतुप घालावे. हे पिठ डब्यात बंद करून ठेवावे. साधारणता आठ दिवसा नंतर हे पिठ आनरसे बनवण्यास योग्य होते.

दिनांक 24-07-2016 01:21:20 Read more

श्री. आनंद देशमाने यांची श्री संत संताजी उत्सव अध्यक्ष पदी निवड

Anand Deshmane elected as chairman of sant santaji jagnade maharaj utsav चाकण :- श्री. आनंद देशमाने जि.प. चे माजी सदस्य यांची संत संताजी तेली समाज संस्था या संस्थेच्या सन २०१५ च्या उत्सव अध्यक्षपदी एकमताने निवड झाली. सुदूंबरे येथे संस्थेची वार्षीक सभा होती. ती खेळी मेळीत झाली. या वेळी पुणे जिल्हा पोलीस प्रमुख मा. संजय पाटील उपस्थीत होते. त्यांनी संस्थेला योगदान देण्याचे जाहीर केले. संस्थेचे कार्य पाहुन ते समाधानी झाले. या वेळी सर्वानुमते श्री. अनंद देशमाने यांची उत्सव अध्यक्ष पदी निवड झाली ते पुणे जिल्हा अध्यक्ष ही आहेत. विकासाचा आराखडा पुर्णत्वास जाण्यास सहकार्य मिळेल ही भावना संस्था अध्यक्ष श्री. जनार्दन जगनाडे यांनी व्यक्त केली.
दिनांक 21-12-2014 11:37:11 Read more

तेली समाजातील व्यक्तीमत्वे डॉ. महेंद्र धावडे

तेली समाजातील व्यक्तीमत्वे डॉ. महेंद्र धावडे (एम.ए.बी.एड., पी.एच.डी.)

        हे तेली समाजाचे गाढे संशोधक, तेली समाज : इतिहास व संस्कृती या  विषयावर डॉक्टरे मिळवली याशिवाय त्या समाजावर सशोनात्मक अनेक गंथ लिहिले. त्यातील प्रमुख गुप्ता बिलाँग टू तेली कम्युनिटी, कॉन्ट्रीबिशन ऑफ तेली कम्युनटी टू बुद्धीझम, व्हॉट काँग्रेस अ‍ॅण्ड बीजेपी हॅव डन फॉर ओबीसी ? आदि सांप्रत कार्यकारी संपादक : उपराधानी साप्ताहिक, नागपुर, सहसंपादक : साहू वैश्य महासभा, दिल्ली राजर्षी शाहू महाराज पुरस्कार, राठोड तेली सन्मान प्राप्त.

दिनांक 24-07-2016 01:15:01 Read more

श्री. प्रभाकर उद्धव कर्डीले यांनी श्री. संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था सुदूंबरे या संस्थेच्या शिक्षण समितीस ५१ हजार रूपयाची देणगी

पुणे येथील औंध परिसरातील स्थाईक असेलेले श्री. प्रभाकर उद्धव कर्डीले यांनी श्री. संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था सुदूंबरे या संस्थेच्या शिक्षण समितीस ५१ हजार रूपयाची देणगी दिली आहे. ही देणगी कै.सौ. सुशीला उद्धव कर्डीले व कै. उद्धव शंकर कर्डिले यांच्या स्मरणार्थ दिली आहे. हे पैसे कायम स्वरूपी ठेव संस्थे कडे ठेवली जाईल याच्या व्याजातुन एस.एस.सी. व एच.एस.सी. परिक्षेत जास्त गुण मिळवणार्‍या विद्यार्थींस प्रत्येकी २५०० रूपये दिले जातील. या बक्षिसाचा लाभ घेण्यासाठी समाजातील विद्यार्थानी अधीक मार्क इ. १० वी इ. १२ वीत मिळवावीत अशी इच्छा व्यक्त केली. संस्था अध्यक्ष श्री. जनार्दन जगनाडे व शिक्षण समिती सचिव श्री. बाळासोा. शेलार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
दिनांक 18-12-2014 03:22:27 Read more

अरे ! कुठे नेवून ठेवलाय ओबीसी माझा ? - श्री. रमेश भोज, पुणे.वि. महा.तेली महा

Ramesh Bhoj सध्या आरक्षण म्हणजे प्रसाद वाटल्यासारखे झाले आहे. कोणीही उठाव आम्हाला आरक्षण पाहिजे म्हणुन आंदोलन करावीत पण हा विचार कोणी करीत नाही की ज्या समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण आहेत त्यांच्या पदरात काय पडते हे कोणीच समजुन ध्यायला तयार नाहीत. मंडल आयोगाच्या शिफारयीनुसार ओबीसी साठी ५२ टक्के आरक्षण आहे केंद्रात ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षण आहे. पण महाराष्ट्रत ओबीसी समाजाला १९ टक्केच आरक्षण मिळते आणि तेही प्रत्यक्षात १३ ते १४ टक्के पदरात पडते हा अन्याय नाही का ? खर्‍या ओबीसींचे फायदे बोगस जातीचे दाखले देवून मिळवीतात आणि ओबीसींच्या सर्व सवलती पदरात पाडुन घेतात. शाासन सुद्धा अशाच लोकांना साथ देते. जेव्हा अशा लोकाविरुद्ध तक्रार नोंदविली जाते. तेव्हा त्याचा निकाल तीन ते चार वर्षांनी लागतो. तोपर्यंत हे लोक सत्ता भोगुन कार्यकालपुर्ण करीत आलेले असतात. भारतीय संविधानाच्या ३४० व्या कलमा नुसार सर्वओबीसींना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आरक्षण मिळालेले आहे. अगोदरच ओबीसीची शैक्षणिक स्थिती अत्यंत मागसलेली असून मागेल त्या समाजाला आरक्षण दिल्यास ओबीसी समाजावर फार मोठा अन्याय होईल ३४० कलमाला काही अर्थ रहाणार नाही.
दिनांक 18-12-2014 03:07:42 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in