Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

अरे ! कुठे नेवून ठेवलाय ओबीसी माझा ? - श्री. रमेश भोज, पुणे.वि. महा.तेली महा

Ramesh Bhoj सध्या आरक्षण म्हणजे प्रसाद वाटल्यासारखे झाले आहे. कोणीही उठाव आम्हाला आरक्षण पाहिजे म्हणुन आंदोलन करावीत पण हा विचार कोणी करीत नाही की ज्या समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण आहेत त्यांच्या पदरात काय पडते हे कोणीच समजुन ध्यायला तयार नाहीत. मंडल आयोगाच्या शिफारयीनुसार ओबीसी साठी ५२ टक्के आरक्षण आहे केंद्रात ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षण आहे. पण महाराष्ट्रत ओबीसी समाजाला १९ टक्केच आरक्षण मिळते आणि तेही प्रत्यक्षात १३ ते १४ टक्के पदरात पडते हा अन्याय नाही का ? खर्‍या ओबीसींचे फायदे बोगस जातीचे दाखले देवून मिळवीतात आणि ओबीसींच्या सर्व सवलती पदरात पाडुन घेतात. शाासन सुद्धा अशाच लोकांना साथ देते. जेव्हा अशा लोकाविरुद्ध तक्रार नोंदविली जाते. तेव्हा त्याचा निकाल तीन ते चार वर्षांनी लागतो. तोपर्यंत हे लोक सत्ता भोगुन कार्यकालपुर्ण करीत आलेले असतात. भारतीय संविधानाच्या ३४० व्या कलमा नुसार सर्वओबीसींना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आरक्षण मिळालेले आहे. अगोदरच ओबीसीची शैक्षणिक स्थिती अत्यंत मागसलेली असून मागेल त्या समाजाला आरक्षण दिल्यास ओबीसी समाजावर फार मोठा अन्याय होईल ३४० कलमाला काही अर्थ रहाणार नाही.
दिनांक 18-12-2014 03:07:42 Read more

उत्सव अध्यक्ष श्री. सुरेश मारूती जगनाडे यांचे मनोगत

श्री. संताजी महाराज श्रीसंत तुकाराम महाराजांचे स्नेही, टाळकरी म्हणा किंवा त्या समकाळातील सहवास लाभलेले तेली समाजाचे संपुर्ण महाराष्ट्रातील समाजाचे दैवत तुकाराम गाथाचे खर्‍या अर्थाने साक्षिदार नव्हे शिल्पकार आणि श्री. क्षेत्र सुदूंबरे समाधी स्थळ होय. संत एकमेकांच्या सहवासातील वाढतात नित्यक्रम करतात एकमेकांचे साक्षिदार होता. एकमेकांच्या वाचनासाठी स्वर्गातुन भुलोकात यावे व समाधी मुक्तीसाठी तीन मुठी माती देणे ही काही साधी गोष्ट नाही. ही फार मोठी भक्ती मधील शक्तीची ताकदच म्हणावी लागेले. तेच हे संत जगद्गुरू तुकाराम महाराजांचे (वास्तव्य) लाभलेले श्री. संताजी महाराजांचे जिंवत स्थळ तुम्हा आम्हा सर्वाचे प्रेरणा स्थान होय.
दिनांक 18-12-2014 01:40:11 Read more

आपण मिळुन सारे श्री. संताजी समाधी स्थळ भव्य करूया.

संत नामदेवा नंतर महाराष्ट्रात सामाजिक, धार्मिक, राजकीय बाबत अन्यायाची आवस्था होती. खर्‍या अर्थाने धर्माला ग्लानी आली होती. आशा वेळी संत तुकारामांच्या नेतृत्वा खाली शेकडो वर्षांची दडपशाही झटकून इतिहास निर्माण करण्याचे कार्य झाले. यामुळे पुढे शेकडो वर्ष जे राजकीय, सामाजिक, धार्मिक परिवर्तन धडले त्याचे शिल्पकार संत संताजी जगनाडे आहेत ते संत तुकारामांचे शिष्य, लेखनिक या त्यांच्या भुमिके पेक्षा धार्मिक व सामाजीक परिर्वतनातील लढाईतले ते एक सर सेनापती होते. हा अभिमान, हि साठवण ही आठवण हे स्फर्ती ठिकाण, ही मानवता तमाम मानव जातीची आहे. आणि याची जाणीव केंद्र शासना, राज्य शासन यांनी ठेवली, ठेवतात व ठेवावी ही लागेल म्हणुन ही तुम्हा आम्हा सर्व तेली समाज बांधवांची कार्यर्त्याची भुमीका आहे. ती आपण पार पाडतो ही पण आज मी या विचार प्रक्रिये द्वारे काही नम्र पणे विचार मांडतोय. या विचार प्रक्रियेतुन आपण मिळुन सारे श्री संताजी समाधी स्थळ भव्य करूया.

दिनांक 18-12-2014 00:40:08 Read more

Sant Santaji jagnade Teli organization Sudumbare

shri sant santaji jagnade maharaj.jpg श्री. संत संताजी जगनाडे तेली संस्‍था सुदूंबरे या संस्‍थे तर्फे विकासाचा आराखडा राबवत आहे. आपण ही या विकासाला सहकार्य दृयाल हा विश्र्वास आहे. संपर्क साधा. अध्‍यक्ष मा. श्री. जनार्दन गोपाळशेठ जगनाडे मु.पो. चाकण ,गणेश बेकरी, सुभाष्‍ चौक, (शनि मंदिरामागे), ता. खेड जि. पुणे. मो. नं. 7350875757 खजिनदार मा. श्री. राजेंद्र गंगाधर घाटकर मो. नं. 9370611951 मुख्‍य सचिव मा. अॅड. रामचंद्र विष्‍णुपंत रायरीकर मो.नं. 9881553366
दिनांक 19-11-2014 12:17:59 Read more

निवडणुकीतील आकडेवारीचे कटु सत्य

त्यात बीडचे दुसरे मंत्री जयदत्त क्षीरसागर हे नावाला ओबीसींचे असून, फक्त स्वत:ची खुर्ची व स्वार्थी सांभाळण्यासाठी आहेत. महाराष्ट्र तेली जातीचे सात आमदार निवडून आलेत पण एकही एनसीपीचा आमदार तेली, क्षीरसागर शिवाय नाही.
दिनांक 09-11-2014 12:59:21 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in