Sant Santaji Maharaj Jagnade
सुबक छापाई व वर्गणीदारांना फक्त १०० रूपयात घरपोच देणे हे आजच्या महागाई काळात शक्य नाही पण ही अशक्य गोष्ट शक्य केली जाते. आज किमान १० लाख रूपये एका मेळाव्यात खर्च होतात. परंतु वधुवरांची कोणतीच फी न घेता त्यांना प्रसिद्धी देणे ही त्यागी मनोवृत्ती गेली ३३ वर्ष समाजा समोर आली आहे. त्यांच्या वाटचालीस माझ्या हार्दिक शुभेच्छा
शिरूर, तळेगाव ढमढेरे, पाबळ, शिक्रापुर, कवठे आसा व इतर १० ते १२ गावात समाज समाजाची १५० घरे वास्तव करणारी परंतु शेकडो वर्ष आपला परंपरेचा व्यवसाय करणारी मंडळी. तो व्यवसाय मोडकळीस येताच यातिल बरेच जण परिस्थीतीशी लढुन यशस्वी ही झाले बरेच जण लढतच आहेत.
शिवणेरीच्या कुशीत वसलेला हा भाग डोंगर दर्यांचा जुन्नर हे तालुका येथिल तेली बुधवार पेठ, सराई पेठ ही समाजाच्या हाक्काची बाजारपेठ शिवकाळा पुर्वी पासुन समाजाने जोपासलेली व वाढवलेली. तेली बुधवार पेठेत समाज वास्तु त्याची साक्ष देते. समाजाच्या आचार, विचार व कृतीचवे हे एक जुने ठिकाण अशाच पद्धतीने नारायणगांव येथे समाजाचे शनी मंदिर व समाजवास्तु येथे ही नियमीत समाज प्रक्रिया सुरू आसते.
भोर तालुका तसा डोंगराळ भोर सोडल्यास पुर्ण तालुक्यात विस्कळीत पणा असतानाही गतशंभर वर्षाचा आढावा घेतल्यास या तालुक्याने सामाजीक राजकीय आर्थीक, धार्मिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवलेला दिसून येईल. संत संताजी जगनाडे महाराजांची समाधी ठिकाणी स्मृतीदिन साजरा होऊ लागताच बांधव जाऊ लागले. त्या ठिकाणी कै. ज्ञानेश्वर पवार, कै. बापुसाहेब किर्वे, कै. शरद देशमाने हे सहभागी झाले. कै. शरद देशमाने हे तर संत संताजी पालखी सोहळा सुरू करण्यास जी १० ते १५ बांधव होते त्यातील एक होते.
लोणंद, ता. २९ : भोर येथील श्री संताजी महाराज तेली समाजाच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा समाज भुषण पुरस्कार यंदा लोणंद येथील सामाजिक कार्यकर्ते रमेश गवळी (अण्णा ) यांना नुकताच प्रदान करण्यात आला.