Sant Santaji Maharaj Jagnade
तेली समाज वधु -वर मेळावा वधु -वर फाॅर्म
Nashik city teli samaj Vadhu Var from 2014
परवाच लोकसभेच्या निवडणुका झाल्या देशाच्या हाजारो वर्षातील इतिहासाला वेगळी कलाटणी देऊन जन्माने ओबीसी असलेले नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. मोदी व त्याचा भाजपा त्या भाजपावरील राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा अंकुश. तो अंकुश ठेवणारी जन्माने ब्राह्मण असलेली मंडळी. या मंडळींचा हजारो वर्षा पासुनचा लबाडीचा धंदा मी याच सदरात उघड केला आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्या नंतर राष्ट्रवादी (मराठावादी) कॉंग्रेस व कॉंग्रेस च्या शरद पवारांना बेंबिच्या देठा पाासून जे वाटते ते बाहेर पडू लागले. त्यांच्या या मराठा प्रेमा समोर दारूण पराभव होऊन सुद्धा ओबीसींचे तारणकर्ते म्हणुन मिरवणारे खरे कारण स्पष्ट जेंव्हा करताना दिसले नाहीत तेंव्हा ओबीसी एजंटांची किव करावी वाटली व पवारांच्या मराठा प्रेमाची कदर करावी वाटली म्हणुन हा पत्रप्रपंच.
तेली समाजाचे खास पदार्थ
कारळी चटणी
काळे तीळ बैलाने फिरवलेल्या घाणीत घालून चांगला भुगा करून घ्याव अथवा भुुगा करून घ्यावा. त्यात काळ्या तिळाचेच तेल व तिखट व मिठ घालावे. पापड भाजुन घ्यावेत व त्याचा चुरा करून तो त्यात् टाकवा. अशा रितीनेकारळी चटणी तयार होईल ही चटणी आरोग्यास अंत्यंत पोष्टीक आसते.
आनारसे
तेली समाज हा शिवास सर्वात जास्त मानतात. त्यामुळे आज ही आनेक ठिकाणी सोमवारी तेल घाणा बंद आसतो. तेल घाण्यास शिवाचे आवातार ही मानले जाते. दसर्याला घाण्याची यथासांग पूजा करून त्यास नैवेद्य दाखविला जातो, तो आनारश्यांचा.
साहित्य :- जुने तांदूळ (चिकट तांदूळ वर्ज्य), कोल्हापूरी पिवळा गूळ, तूप, खसखस साखर,
कृती : तांदूळ स्वच्छ धुऊन भिजत घालावेल, दररोज पाणी बदलून तांदूळ 3 दिवस भिजत ठेवावे. नंतर ते उपसून पाणी निथळून काढावे तांदूळ दमट असतानाच ते कुटून अगर मिक्सरमधुन त्याचे खुप बारीक पिठ करावे. जेवढ पिठ आसेल तेवढाचाच वजनाचा गुळ बारीक किसुन घ्यावापीठ व गुळ निट एकजिव करावा व त्यात दोन चमचे साजुकतुप घालावे. हे पिठ डब्यात बंद करून ठेवावे. साधारणता आठ दिवसा नंतर हे पिठ आनरसे बनवण्यास योग्य होते.
चाकण :- श्री. आनंद देशमाने जि.प. चे माजी सदस्य यांची संत संताजी तेली समाज संस्था या संस्थेच्या सन २०१५ च्या उत्सव अध्यक्षपदी एकमताने निवड झाली. सुदूंबरे येथे संस्थेची वार्षीक सभा होती. ती खेळी मेळीत झाली. या वेळी पुणे जिल्हा पोलीस प्रमुख मा. संजय पाटील उपस्थीत होते. त्यांनी संस्थेला योगदान देण्याचे जाहीर केले. संस्थेचे कार्य पाहुन ते समाधानी झाले. या वेळी सर्वानुमते श्री. अनंद देशमाने यांची उत्सव अध्यक्ष पदी निवड झाली ते पुणे जिल्हा अध्यक्ष ही आहेत. विकासाचा आराखडा पुर्णत्वास जाण्यास सहकार्य मिळेल ही भावना संस्था अध्यक्ष श्री. जनार्दन जगनाडे यांनी व्यक्त केली.