Sant Santaji Maharaj Jagnade
मुंबई :- बृहन्मुंबई तिळवण तेली समाज, मुंबई या उपरोक्त संस्थेच्या वतीने भव्य वधु-वर पालक परिचय मेळावा रविवार दिनांक २२ फेब्रु २०१५ रोजी दुपारी १.०० वा. म्युनिसिपल स्कुल सभागृह ना. म. जोशी. मार्ग, डिलाईल रोड, मुंबई - ४०००११ येथे आयोजित करण्यात आला.
समाजातील गोरगरीब जनतेसाठी काम करणारा, त्यांना आपले म्हणुन समाजात काम करणारा समाजसेवक यांची समाजाला गरज आहे. समाजात अनेक संघटना काम करतात परंतु समाजाची गरज ओळखुन कार्य करणे गरजेचे आहे. केवळ प्रसिद्धीसाठी कार्य न करता समाजातील गरजु घटक केंद्र बिंदु माणून कार्य करणे गरजेचे आहे.
चिंचवड :- महाराष्ट्र तेली महासभा पिंपरी चिंचवड जिल्हा या ठिकाणी वाकड येथिल प्रसिद्ध उद्योजक मा. संदिप चिलेकर यांची निवड करण्यात आली. या सुयोग्य निवडी मुळे पिंपरी चिंचवड परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
शिरूर - महिला सक्षम व संघटीत तरच समाज वैभव संपन्न होणार आहे. या संघटने साठी. महिला बचत गटा द्वारे संघटीत होत आहेत. तेली महासभेचे कार्य हाती घेताच पुणे ग्रामिण मध्ये काही बचत गट कार्यरथ झाले. शिरूर शहरातून याची सुरूवात गत दोन वर्ष सुरू आहे.
या तालुक्यात समाज संख्या तशी कमी मंचर, घोडेगांव, अवसरी ही गावे सोडली तर तुरळक लोकसंख्या. त्यामुळे कळंब, भावडी, म्हळुंगे या गावाव्यतिरिक्त काही गावात २/३ घरे नाहीत तरी सुद्धा समाजाचा ठसा न पुसता येणारा. देवगीरीवर यादवांचे राज्य अनेक शतके होते. त्यांची भवानी माता हे दैवत होते. देवगीरी उध्वस्त झाल्यानंतर धाम धुमीच्या काळात सुरक्षित म्हणुन ब्रर्हाणनगर येथे जतन केली गेली.