येथील श्री. माधवराव राऊत, रमेश राऊत, सुनिल राऊत, नगीने उबाळे या मंडळींनी संघटन सुरू केले समाजाचा फंड ही सुरू केला समाज संस्था जागा ही घेण्याची धडपड करीत आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात संताजी उत्सव व हाळदी कुंकू सभारंभ साजरे केले जातात.
१९९९ मध्ये पुणे कॅम्प परिसरातील बांधवांनी संघटन सुरू केले. या संघटने तर्फे संत संताजी पुण्यतिथी साजरी करणे. खाने सुमारी करणे महिला साठी तिळगुळ समारंभ साजरा करणे इतर उपक्रम चलवतात. मंडळाचे सर्व सभासद अध्यक्ष असतात. असे श्री. गणेश भोज व श्री. संजय व्हावळ सांगतात.
परंतु त्यावेळी प्रचंड विरोध अंगावर घेत शंकरराव करपे नगराध्यक्ष झाले. हार न माणनार्या या जमाती मधील आचार्य आत्रे यांनी सुर लावला. सायकलवर बसला कसा शंकर नाना खाली बसा. कै. करपे यांनी आशा विरोधाला न जुमानता पुण्याचा विकास ही केला.
समाजा बद्दल प्रेम असल्याने ते कार्यालयात असत. सुदूंबरे संस्थेत ते सहभाग घेत १९६१ च्या प्रलयंकारी महापुराच्या वेळी पुरग्रस्थाना मदत केंद्रात सक्रीय होते. त्यांचे चिरंजीव श्री. विजयकुमार शिंदे हे तिळवण तेली व या संस्थेचेे माजी अध्यक्ष आहेत. तसेच संताजी उत्सवाचे अध्यक्ष ही होते.
त्यांनी प्रथम सामुदाईक विवाह सुरू केला यातील अडचनीला सामोरे जाताना वधु-वर मेळावा ही संकल्पना पटली. आगदी पुणे जिल्हा व सातारा, नगर, नाशीक, रायगड मुंबई येथे घरोघरी जावुन संकल्पना पटवून देऊन मेळाव्यात सहभाग वाढवला. एक पुणेकर काय करू शकतात हे सर्वांना पटले गेले.