कोथरूड येथे सुरूवातीला श्री. संताजी जगनाडे महाराज तिळवण तेली समाज ट्रस्ट म्हणुन १९९३ मध्ये स्थापन करण्यात आला. या ट्रस्टची स्थापना होण्यापुर्वी सन १९९२ मध्ये तिळवण तेली समाज, ८२ भवानी पेठ येथील निवडणूक जाहीर झाली होती. त्यावेळी मी व श्री विजय भोज आम्हा दोघांना काही ट्रस्टींनी १९८६ ची मतदार यादी देऊन या भागातील समाजबांधवांना मतदनासाठी कार्यालयात येण्याचे सांगितले. त्यानुसारर मी आणि श्री. विजय भोज आम्ही दोघांनी मतदार यादीनुसार येथील प्रत्येक समाजबांधवाकडे जावुन मतदानासाठी कार्यालयात येणाचे आवाहन केले. परंतु मतदानासाठी आलेल्या समाजबांधवांनी कार्यालयात येऊन मतदार यादीत आपले नाव शोधले असतार एकाही समाजबांधवाचे नाव यादीत आढळले नाही.
८२ भवानी पेठ पुणे व २८६ मंगळवार पेेठ य दोन वास्तु समाजास दान केल्या ते कै. अप्पासाहेब भुजंगराव भगत, स्वातंत्र्य पुर्वकाळातील पुणे नगरपालिकेचे नगराध्यक्ष कै. केशवराव अप्पासाहेब भगत, तिळवण तेली समाजाचे अध्यक्ष कै. रत्नाकरदादा भगत कै. विश्वनाथ भगत व श्री. रामचंद्र भगत यांचा वारसा परंपरेनुसार सुरू ठेवून सन २००२ ते सन २०१५ पर्संत विश्वस्त पदावर राहण्याचा मिळालेला मान अभिमानास्पद आहे. समाज बंधु भगिनींनो आपण सर्वाच्या सहकार्याने तिळवण तेली समजा पुणे ८२ भवानी पेठ पुणे २ या संस्थेचे सामाजिक कार्य करीत असताना २५ वर्षांपासुन सुरू असलेला वधुवर परिचय मेळाव्यात यशस्वी करण्यात सक्रिय सहभाग राहिलेला आहे.
कै. केशवराव भगतांच्या जवळ असल्याने त्यांना समाजाचा ओढा होता. याच मुळे ते लोकशाही मार्गाने समाजाचे अध्यक्ष ही झाले. यासाठी कै. आप्पासाहेब भगत, कै. विष्णूपंत शिंदे कै. जगन्नाथ व्हावळ यांनी साथ सोबत दिली. यांच्याच कार्यकाळात १९६१ मध्ये पुणे येथे महापूर आला या महापूरात शेकडो कुटूंबांचे संसार उध्वस्त झाले. घरेदारे जमीनदोस्त झाली. आशा वेळी धोमकर यांनी अध्यक्ष म्हणून पुढाकार घेऊन समाज कार्यालयात आसरा दिला. पुरग्रस्तांना मदत केंद्र सुरू केले.
पुण्या परिसरातील पवार पुण्यात व्यवसायाने स्थीर झाले. आपला व्यवसाय संभाळत ते समाज कार्यात उभे राहिले ते दोन वेळा ८२ भवानी पेठे येथिल तिळवण तेली समाजाचे अध्यक्ष होते. समाजाच्या कार्या बरोबरच त्यांचे इतर सामाजीक कार्य पुण्याचे वैभव म्हंटले तर योग्य ठरेंल स्वारगेट जवळील रेखीव नगर म्हणुन सुभष नगर म्हणून संबोधले जाते. त्याची उभारणी त्यांनी केली. पुणे सातारा रोड वरील आदर्श सोसायटी राजश्री शाहू सोसायटी ही त्यांचीच धडपड.
आशा बिकट परस्थितीत त्यांनी अध्यक्षपद स्विकारले. धर्मकारण व समाजकारण ही विचाराची बैठक पुर्वजांनी निर्माण करून वाढवलेली तीच पद्धत सुरू ठेवली राजकारण, अर्थकारण व समाजाकरण ही तेली महासभेची बैठक. या दोन्ही समाज संस्थेत समन्व्य साधुन जो सर्वाचा सर्वगटांचा, सर्व पक्षांचा म्हणजे समाजाचा भव्य महामेळावा झाला. तो यांच्याच काळात. स्वागताची, महाप्रसादाची जबाबदारी संस्थेकडे आली. लाखो बांधव एकाच वेळी पुण्यतिथीला येणे हा इतिहास घडवायचा होता.