Sant Santaji Maharaj Jagnade
![]()
शेकडो वर्षा पासून पंढरपूरला पायी वारी करत विठ्ठल भेटीला जाण्याची परंपरा, वारकरी संप्रदायातील महान संतानी चालू केली. याच संतमंडळी मध्ये संत शिरोमणी तुकाराम महाराज देहूकर यांच्या निकटच्या शिष्यांपैकी व १४ टाळकर्यां पैकी एक असलेले आमचे संत श्री. संताजी महाराज जगनाडे (चाकणकर) यांची सुद्धा सुदुंबरे ता. मावळ, जि. पुणे या समाधी स्थळा पासून पालखी सोळहा सुरू केला गेला.
ओबीसीच्या टक्केवारीत वाढ होणारा आणि तो समाज शिक्षण, नोकरी, सत्ता या सर्वांमध्ये वाटा मागणार या सर्व कारणांमुळे ओ.बी.सी. ची जातीनिहाय जनगणनला होउ दिली जात नाही. असे मत श्री. रमेश भोज अध्यक्ष पुणे ओबीसी सेवा संघ, पुणे जिल्हा दि. २६/०६/२०१५ रोजी आरक्षणाचे जनक राजर्षी शाहु महाराज यांच्या जयंती निमित्त झालेल्या कार्यक्रमात व्यक्त केले.
![]()
तिळवण तेली समाजातील समाजहिताच्या गरजा लक्षात घेऊन पुणे जिल्हा कार्यक्षेत्रात आज दि. ५/७/२०१५ चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर पुणे येथे श्री. रमेश भोज यांच्या अध्यक्षतेखाली श्री. विजय रत्नपारखी, सौ. राधिकाताई मखामले, श्री. दिलीप शिंदे, श्री. संतोष व्हावळ, श्री. प्रीतम केदारी, श्री. महेश अंबिके, श्री. गणेश चव्हाण, श्री. अनिल उबाळे, श्री. राजू हाडके, श्री. संदीप चिलेकर, श्री. सचिन काळे, श्री. सूर्यकांत बारमुख यांनी एकत्र येऊन विचरविनिमय करून नवीन संघटना स्थापना करण्याचे एकमताने ठरविले.
![]()
श्री. संताजी महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान श्री. क्षेत्र सुदुुंबरे येथुन दिनांक ८ जुलै २०१५ रोजी होत असुन महाराजांच्या पालखी रथासाठी या वर्षी श्री. ज्ञानोबा बाबूराव भगत रा. डोंजे, ता. हवेली, जि. पुणे यांच्या सर्जा-राजा या बैलजोडीस या वर्षाचा मान मिळालेला आहे. अशी माहिती पालखी सोहळा प्रमुख श्री. अरूण काळे यांनी दिले.
मिती अधिक आषाढ वद्य ॥७॥ बुधवार दि. ०८/०७/२०१५ ते निज आषाढ वद्य. ॥१५॥शुक्रवार दि. ३१/०७/२०१५