कन्हान - कल्पेश बावनकुळे या युवकाच्या हत्याऱ्यांना ४८ तासांच्या आत अटक करून कन्हान व ग्रामिण भागात रात्रीची गस्त आणि नागपुर बॉयपास महामार्गावरील बोरडा रोड चौकात पोलीस चौकी व सीसीटीव्ही कॅमरे त्वरित लावावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना रामटेक माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव यांच्या नेतृत्त्वात शिवसेना, संताजी ब्रिगेड, तेली समाज महासभा
धुळे - भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश अध्यक्ष पदी माजी विज मंत्री, आमदार चंद्रशेखर बावनकळे यांची नुकतीच निवड झाली. त्यांचा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा आयोजित तेली समाजाच्या वतीने जाहिर सत्कार व सामाजिक संवादाचा कार्यक्रम सोमवार दि. १२ सप्टेंबर २०२२ रोजी धळे शहरात होणार आहे तरी तेली समाज बंधु - भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने करण्यात आले आहे.
- भगवान बागूल (पत्रकार) मालेगाव (नाशिक) मोबा. - ९८२३३४०४०९
समाजमित्रा,
फार दिवसांपुर्वी मी 'अश्वत्थाम्याची जखम आणि तेली समाज' हा लेख लिहिला होता. स्वप्नात भिक मागण्यासाठी माझ्या घरासमोर उभा असलेला, कपाळावरील जखम वाहत असलेला, माशा घोंगावत असलेला अश्वत्थामास मी पुढे जा असे सुनावतो ! त्यावर चिडलेला अश्वत्थामा-तू तेली समाजसुधारक म्हणवतोस ना ? ‘ऐक, तुझ्या समाजाच्या जखमा’ असे म्हणून तेली समाजाचे सर्व दोष सांगू लागतो. असा त्या लेखाचा विषय होता.
मुंबई तेली समाजा नेते तथा विधान परिषद सदस्य श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांची भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्या नंतर प्रथमच त्यांचे देशाची आर्थिक राजधानी व स्वप्नांचं शहर मुंबईत आगमन झाले. या प्रसंगी त्यांचे तेली सेनेच्या वतीने तेली समाजाचा नेते मा.श्री.अनिल मकरिये यांच्या नेतृत्वात व गणेश पवार यांच्या पुढाकाराने मुंबई विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आले.
चांदा जिल्हा संताजी शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूर, गुणवंत गौरव समारंभ २०२२, स्थळ - श्री संताजी वस्तीगृह, मुल रोड, रेंजर कॉलेज समोर, चंद्रपूर, दिनांक रविवार दि. १४ ऑगस्ट २०२२ ला दुपारी २.०० वाजता, तेली समाजातील शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात वर्ष २०२१२०२२ मध्ये गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्यास सर्वान उपस्थिती रहावे ही विनंती करण्यात आलेली आहे.