दिनांक 28/1/2023 ला जवाहर विध्यार्थी गृह, संत्रा नगरी व मेट्रो सिटी नागपूर येथे आयोजित करण्यात आले. विविध वयोगटाच्या मुली व महिलांनी आपल्या कलेचे प्रदर्शन केले. सौ. पूजा कांबळे यांनी साकारलेली श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांची हुबेहू रांगोळीने विशेष लक्ष वेधले, कार्यक्रमात नृत्य, लावणी , पोवाडे, उखाणे, गाणे, गेम्स व अन्य आयोजनामुळे महिलांनी कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला
श्री. संताजी तेली समाज राज्यस्तरीय सर्व शाखीय उप वधू-वर व पालक परिचय मेळावा वर्धा, ता. जि. वर्धा. आयोजक : श्री संताजी जगनाडे महाराज फाऊंडेशन, वर्धा. कार्यालय : द्वारा मनिषा लॅण्ड डेव्हलपर्स, 'वरदविनायक कॉम्प्लेक्स', पारस आईस फॅक्टरी चौक, प्रताप नगर, बॅचलर रोड, वर्धा. - ४४२००१ व्हॉटस् अॅप ः ९३२५९६९९७१ (कार्यालय) निःशुल्क नोंदणी अर्ज कार्यक्रम दिनांक: रविवार, ०८ जानेवारी २०२३
नागपूर पी. डब्ल्यू. एस. महाविद्यालयातील अर्थशास्त्राच्या निवृत्त प्रा. डॉ. आशा लांजेवार यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात डॉ. श्रीराम कऱ्हाळे यांच्या हस्ते डॉ. लांजेवार यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. लांजेवार यांनी शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल तसेच सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य, कला
नागपूर, १३ डिसेंबर महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा दक्षिण नागपूरच्या वतीने श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी आ. मोहन मते, आ. कृष्णा खोपडे, नयना झाडे, मंगला मस्के, जयश्री गभणे, लता होलगरे, रोशनी बारई यांच्यासह इतर महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
रसुलाबाद : स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात श्रीसंत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात गुरुवार, ८ डिसेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून जयंती साजरी करण्यात आली.