नागपूर. संत संताजी स्मारक समिती जगनाडे चौक नागपूर यांच्या वतीने शुक्रवारी संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आमदार कृष्णा खोपडे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी 'संताजी अध्यासन केंद्र सुरू करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली.
गडचिरोली - दि. ८ डिसेंबर - संत तुकोबारायांची गाथा पुन्हा लिहुन तेली समाजावर अनंत उपकार करणारे थोर संत श्री.संताजी जगनाडे महाराज यांची ४२४ वि जयंती स्थानिक इंदिरा गांधी चौकामध्ये संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली.
आरमोरी :- नेहमी सामाजिक, आरोग्य, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम घेऊन लोकहिताचे कार्य करणाऱ्या युवारंग लोकहीत संघटना ,आरमोरी व राजमाता जिजाऊ कराटे ग्रुप आरमोरी तर्फे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा आज दि.८ डिसेंबर २०२३ ला सकाळी ७:०० वाजता जुना बसस्टँड स्थित श्री.संताजी जगनाडे महाराज प्रतिष्ठान येथे पुष्पहार अर्पण करून
संताजी स्नेही मंडळ, वालसरा ता. चामोर्शी, जि. गडचिरोली यांचे वतीने संत शिरोमणी श्री. संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्य समाज प्रबोधन किर्तन व हळदी कुंकवाचा कार्यक्रम, दिनांक :- ८ डिसेंबर २०२३ रोज शुक्रवारला सकाळी ११.०० वाजता. स्थळ जि.प.उच्च प्राथमिक शाळा, वालसरा चे भव्य पटांगनात, उद्घाटक :- मा. श्री. मधुकर केशवरावजी भांडेकर युवा सामाजिक कार्यकर्ता यांचे शुभ हस्ते
वर्धा - महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा वर्धा जिल्हयाच्या वतीने दिपावली स्नेहमीलन चे आयोजन आज दिनांक ०२/१२/२०२२ ला यमुना लॉन, नालवाडी येथे सायं. ०६.०० वा केलेले आहे. समाजातील सर्व बंधु भगिनींना, सर्व शाखेतील व संघटनेतील सदस्यांना कळविण्यात येते दिपावली स्नेहमिलन, स्नेह भोजन व सुगम संगीताच्या कार्यक्रमाला सामजिक बांधीलकी दृष्टीने