Sant Santaji Maharaj Jagnade
मध्य प्रदेश श्री तेली समाज विकास मंडळ, इंदूर आयोजित राज्यस्तरीय वर - वधू मेळावा 26 जानेवरी 2024 मेळाव्याचे ठिकाण : स्व. हल्कीबाई यादव (यादव मांगलिक भवन), आस्था सिनेमा जवळ, पाटनीपुरा, मेनरोड़, इन्दौर (म. प्र.) परिचय पुस्तिकेसाठी वर-वधूची माहिती फॉर्म पाठविण्याचा पत्ता: सांईकृपा प्रिंटिंग प्रेस नन्दानगर, चर्च के पास, इन्दौर
श्री संताजी जगनाडे महाराज जन्मोत्सव समिती जिल्हा गडचिरोली चे वतीने श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती निमित्य समाज प्रबोधन व किर्तन कार्यक्रम. रविवार दिनांक १० डिसेंबर २०२३ ला सकाळी ११.०० वाजता * स्थळ : श्री संताजी स्मृती प्रतिष्ठान, सर्वोदय वार्ड पटवारी भवनच्या मागे, आरमोरी रोड, गडचिरोली
नागपूर :-आशियाई क्रिडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी आशियाई स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करत पदकांची लयलूट केली आहे. भारताने या स्पर्धेत 100 पेक्षा पदके पटकावली असून नागपूरच्या ओजस देवतळेनेही दमदार कामगिरी करत सूवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. त्यामुळे ओजसवर सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
नागपूर : तेली समाजाचे वरिष्ठ नेते, मार्गदर्शक, तेली समाज सभेचे अध्यक्ष व नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष बाबूराव अंतूजी वंजारी यांचे निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. २० वर्षांपासून ते तेली समाज सभेचे अध्यक्ष होते. त्यांच्या पार्थिवावर रविवारी गंगाबाई घाट येथे समाजबांधवांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
गडचिरोली : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा विभागीय बैठक नागपूर येथील जवाहर विद्यार्थी सभागृह येथे २८ ऑक्टोबर रोजी पार पडली. यावेळी योगिता पिपरे यांची महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा नागपूर विभाग महिला आघाडी संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.