नागपूर, ता. १० : संताजी ब्रिगेड तेली समाज महासभेतर्फे संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने पारडी येथून संताजी जगनाडे महाराजांच्या प्रतिमेसह भव्य बाईक रॅली व भव्य शोभायात्रा करण्यात आली. त्याच प्रमाणे ढोल ताशा पथक व पारंपरिक आखाड्याचे सुद्धा प्रात्यक्षिक करण्यात आले. बाईक रॅली चे समापन जगनाडे चौक नागपूर येथे करण्यात आले. यावेळी संत जगनाडे महाराजांना संस्थापक अजय धोपटे अध्यक्ष विजय हटवार,
गडचिरोली : भारत ही संतांची भूमी असून प्रत्येक समाजामध्ये संत आहेत. त्या संतांचे विचार आत्मसात केल्यास समाजात परिवर्तन शक्य असल्याचे प्रतिपादन छत्रपती संभाजी नगरचे (औरंगाबाद) संत साहित्याचे अभ्यासक प्रा. विजय गवळी यांनी केले.
नागपूर - संताजी ब्रिगेड तेली समाज महासर्व महासभा नागपूरच्या संताजी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. बाईक रॅली शोभायात्रा रक्क्तान शिबिर असे विविध कार्यकमांचे आयोजन करून तैलिक समाजाचे वतीने संत शिरोमणी संत जगनाडे महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पारडी येथून संताजी जगनाडे महाराजांच्या प्रतिमेसह बाईक रॅली व शोभायात्रा काढण्यात आली.
नागपूर. संत संताजी स्मारक समिती जगनाडे चौक नागपूर यांच्या वतीने शुक्रवारी संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आमदार कृष्णा खोपडे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी 'संताजी अध्यासन केंद्र सुरू करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली.
गडचिरोली - दि. ८ डिसेंबर - संत तुकोबारायांची गाथा पुन्हा लिहुन तेली समाजावर अनंत उपकार करणारे थोर संत श्री.संताजी जगनाडे महाराज यांची ४२४ वि जयंती स्थानिक इंदिरा गांधी चौकामध्ये संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली.