आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राष्ट्रीय व प्रादेशिक पक्ष कामाला लागलेली आहे अशातच सर्वात जास्त लोकसंख्या असलेला तेली समाज आज सर्वच राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षाच्या माध्यमातून दुर्लक्षित होताना दिसत आहे. त्यामुळे या समाजाला लोकसंख्येच्या दृष्टीने राजकीय क्षेत्रात भागीदारीसाठी मैदानात उतणार आहे.
संताजी कल्याणकारी मंडळ दक्षिण पश्चिम व संताजी बिग्रेड तेली समाज महासभा आयोजित संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा कार्यक्रम - रविवार 14/01/2024 ला दुपारी 3 वाजता पासुन, स्थळ - भगवती सभागृह, गजानन मंदीर समोर, त्रिमुर्ती नगर, नागपूर. तेली समाजाचे आराध्ये दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन संताजी कल्याणकारी मंडळ दक्षिण-पश्चिम नागपूर तर्फे करण्यात आलेले आहे.
गडचिरोली : श्री संत जगनाडे महाराज यांच्या विचारांची समाजाला गरज असून विज्ञानवादी दृष्टीकोन समाजात रुजविण्याकरिता सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन संताजी स्मृती प्रतिष्ठानच्या संचालकांनी केले.
श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी स्मरणोत्सव सोहळा, कार्यक्रम पत्रिका, मंगळवार, दि. ९ जानेवारी २०२४ सकाळी ९.०० वा, स्थळ • श्री संत संताजी जगनाडे महाराज स्मारक जगनाडे चौक, ग्रेट नाग रोड, नंदनवन, नागपूर- ९. संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी पर्वावर या सोहळ्यास आपन सर्वांची उपस्थिती प्रार्थनिय आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील तालुका नेर येथे दिनांक 8/12/23 रोजी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली तसेच गाव कुशीत पावन असलेले मानंकी आंबा येथील श्री संत उद्धव बाबा यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असता दिनांक 10/12/23 ला नेर शहरातून अनेक गावातील भजनी मंडळे