नागपूर :-आशियाई क्रिडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी आशियाई स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करत पदकांची लयलूट केली आहे. भारताने या स्पर्धेत 100 पेक्षा पदके पटकावली असून नागपूरच्या ओजस देवतळेनेही दमदार कामगिरी करत सूवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. त्यामुळे ओजसवर सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
नागपूर : तेली समाजाचे वरिष्ठ नेते, मार्गदर्शक, तेली समाज सभेचे अध्यक्ष व नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष बाबूराव अंतूजी वंजारी यांचे निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. २० वर्षांपासून ते तेली समाज सभेचे अध्यक्ष होते. त्यांच्या पार्थिवावर रविवारी गंगाबाई घाट येथे समाजबांधवांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
गडचिरोली : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा विभागीय बैठक नागपूर येथील जवाहर विद्यार्थी सभागृह येथे २८ ऑक्टोबर रोजी पार पडली. यावेळी योगिता पिपरे यांची महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा नागपूर विभाग महिला आघाडी संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
नागपूर : विदर्भ तेली समाज महासंघ व डॉ. मेघनाद साहा प्रबोधन मंचच्या वतीने परिचय मेळावा व पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन सेवादल महिला महाविद्यालय, सक्करदरा चौक, उमरेड रोड येथे करण्यात आले. डॉ. नामदेव हटवार यांच्या डॉ. मेघनाद साहा यांच्यावरील पुस्तकाचे व 'आधार- ६' या परिचय पुस्तिकेचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
नागपूर: विदर्भ तेली समाज महासंघाचे सरचिटणीस प्रा. डॉ. नामदेवराव हटवार लिखित "डॉ. मेघनाथ साहा व्यक्ती व कार्य " या पुस्तकाचे प्रकाशन सेवादल महिला महाविद्यालय येथे करण्यातआला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. संजय शेंडे कार्याध्यक्ष पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. प्रा. संजय ढोबळे शास्त्रज्ञ भौतिकशास्त्र विभाग रातुम नागपूर विद्यापीठ