Sant Santaji Maharaj Jagnade
धुळे - तेली समाजातील मार्केट यार्ड परिसरातील स्वामीनारायण सोसायटी मधील युवक स्व. पवन सुदाम चौधरी यांचे मुक्ताईनगर जिल्हा जळगाव येथे अपघाती निधन झाले होते.अपघाती निधन झाल्यानंतर वसुधारा डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक श्री व्ही.जी. पाटील साहेब यांच्याकडे खान्देश तेली समाज मंडळाने सतत पाठपुरावा करून मदत मिळवून दिली.
आरोग्याला फायदेशीर, दोन वर्षांत विक्रीत वाढ; तुलनेत किमती जास्त, तरीही वाढतेय मागणीपिढ्यान्पिढ्या चालत आलेले दगडी, बैलांचे लाकडी तेलघाणे इतिहासजमा झाले आणि ८० च्या दशकात वीजघाणे आले. त्यात खाद्य तेलविक्रीत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्या उतरल्या. कंपन्यांच्या जीवघेण्या स्पर्धेतही औरंगाबादेत पारंपरिक लाकडी तेलघाणे आपले अस्तित्व टिकवून दिमाखात सुरू आहेत.
दि ७/९/२०२२ रोजी श्री क्षेत्र देहू गाव जि. पुणे गावातील प्रवेशद्वार स्वागतकमान २०१७ साली उभारण्यात आली होती संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज आणि त्यांच्या सोबत असलेल्या १४ टाळकरी यांची भक्तांना व वारकऱ्यांना कायम आठवण राहील अशी सुंदर व भव्यदिव्य स्वागत कमान उभारण्यात आली होती परंतु श्री संत तुकाराम महाराज यांच्या १४ टाळकऱ्यां पैकी तेली समाजाचा मान बिंदू
महाराष्ट्रातील सर्वात अग्रेसर असलेली अखिल तेली समाज सांस्कृतिक सेवा संस्थेच्या वर वधू सुचक मंडळाच्या माध्यमातून नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून नुकतेच रजु झालेले डॉ. विपिनजी इटनकर यांचा सत्कार अखिल तेली समाज सांस्कृतिक सेवा संस्थेच्या माध्यमातून करण्यात आला. या प्रसंगी त्यांनी समाजाचा वर वधु मेळावा घेतल्यास माझ्या कडून मदत करून मला बोलवल्यास निश्चितच होणाऱ्या कार्यक्रमात उपस्थित राहील.
कोरेगाव तालुका तिळवण तेली समाजाच्या वतीने आज कोरेगाव येथे मा. आमदार श्री महेशजी शिंदे, कोरेगाव - खटाव - सातारा यांची कोरेगाव येथे शासकीय विश्रामगृहात समक्ष भेट घेतली समाजाची गेल्या काही वर्षापासूनची प्रमुख मागणी समाज मंदिरा साठी जागा व सभामंडप या दोन गोष्टी आमदार साहेबांपुढे मांडल्या गेल्या.