सहरसा - प्रखंड के दोरमा तेलियारी टोला स्थित शिव मंदिर परिसर में रविवार को बिहार तैलिक साह सभा की एक बैठक हुई । सेवानिवृत्त शिक्षक भुवनेश्वर साह के अध्यक्षता एवं राकेश कुमार साह के संचालन में आयोजित बैठक में साह समाज के विकास एवं एकजुटता पर चर्चा किया गया ।
कोपरगाव - संत जगनाडे महाराजांनी संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानले होते. संत जगनाडे महाराज जगतगुरू संत तुकाराम महाराजांच्या मूळ गाथेचे लेखनकर्ते व चौदा टाळकऱ्यांपैकी एक विश्वासू टाळकरी होते. संत जगनाडे महाराजांनी तुकाराम महाराजांच्या साहित्याचा अनमोल साठा जगाला दिला असल्याचे प्रतिपादन साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी केले.
वरणगाव : वरणगाव येथे समस्त तेली समाजाचे आराध्य दैवत संत तुकाराम महाराजांच्या मुळ गाथेचे लेखक श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ता दींडी सोहळा आयोजित करण्यात आला होता . तसेच श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांच्या मुर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली आहे.
सोनगीर : मुडावद, ता. शिंदखेडा येथील ग्रामपंचायतीत संताजी जगनाडे महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सरपंच भारती चौधरी व उपसरपंच सुनीता मालचे यांच्या हस्ते जगनाडे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन केले. यावेळी तेली समाजाचे कार्यकर्ते सुरेंद्र चौधरी व तेली समाज बांधव तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
जालना, दि.१ : महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, संताजी जगनाडे महाराज यांचे विचार हे प्रेरणादायी असून, संतांनी नेहमी सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक एकतेचा संदेश दिला. आज समाजाला खऱ्या अर्थाने संत विचारांची गरज आहे असे प्रदिपादन ह.भ.प. योगीराज महाराज यांनी केले. संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त जालना शहरात कन्हैयानगरात जानेवारी रोजी कार्यक्रम घेण्यात आला.