Sant Santaji Maharaj Jagnade
जळगाव : अनावश्यक खर्च टाळण्यासाठी आणि समाजात समानता निर्माण करण्यासाठी सामूहिक विवाह सोहळे आयोजित करणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशीय युवक मंडळाच्या वतीने रविवारी (१४ डिसेंबर) शांताराम नारायण चौधरी नगर (खान्देश सेंट्रल) येथे आयोजित वधू-वर परिचय मेळाव्यात ते बोलत होते.
गडचिरोली : श्रीसंत शिरोमणी जगनाडे महाराज यांचा जयंती उत्सव येत्या २७ डिसेंबर रोजी शहरातील आरमोरी मार्गावरील संताजी सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. १४ डिसेंबर रोजी पार पडलेल्या तेली समाज संघटनेच्या नियोजन बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. बैठकीत श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्याने काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
जळगाव जामोद (बुलढाणा जिल्हा) येथे दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराजांची ३२६वी पुण्यतिथी मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरी करण्यात आली. हा उत्सव तेली समाज पंच मंडळ जळगाव जामोद यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. संताजी जगनाडे महाराज हे संत तुकाराम महाराजांच्या काळातील थोर संत आणि अभंग गाथेचे प्रमुख लेखक मानले जातात.
श्री संताजी अखिल तेली समाज संघटन वाडी शाखेद्वारे श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथि निमीत्त श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार पुष्पगुच्छ अर्पन करण्याचा कार्यक्रम श्री पुरुषोत्तम लिचडे यांच्या कार्यालयात खडगांव रोड वाडी नागपूर येथे पार पडला.आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वासुदेवराव लिचडे ,प्रमुख अतिथी श्री दिपक अवचट,श्री प्रशांत बुटले,
सातारा जिल्ह्यातील वर्णे गावात दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी मार्गशीर्ष अमावस्या निमित्त श्री संताजी जगनाडे महाराजांची पुण्यतिथी मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरी करण्यात आली. संताजी जगनाडे महाराज हे संत तुकाराम महाराजांचे समकालीन संत आणि त्यांच्या अभंग गाथेचे प्रमुख लेखनिक म्हणून ओळखले जातात. तेली समाजातील हे थोर संत भक्ति परंपरेचे जिवंत प्रतीक मानले जातात.