धुळे - खान्देश तेली समाज मंडळाच्या मेळाव्याने संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक मिळविला असून आपल्या मेळाव्याच्या माध्यमातून दरवर्षी अनेक विवाह जुळून खरी समाजसेवा मंडळाचे कार्यकर्ते करत असल्याचे प्रतिपादन माजी महापौर सौ.कल्पना महाले यांनी केले ते खान्देश तेली समाज मंडळ आयोजित वधू वर परिचय मेळाव्याचे फॉर्म प्रकाशन वेळी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
तुमसर, २०२५: श्री संताजी स्नेही समाज मंडळ, तुमसर आणि श्री संताजी उत्सव समितीच्या वतीने तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि शैक्षणिक तसेच व्यवसाय मार्गदर्शनाचा भव्य कार्यक्रम २० जुलै २०२५ रोजी (रविवार) दुपारी १२:३० वाजता संताजी सभागृह, तुमसर येथे आयोजित करण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड, २०२५ : पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील तेली समाजाने २०२५ मध्ये १०वी आणि १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजनेची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळणार आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत २० जुलै २०२५ असून,
जालना ( प्रतिनिधी ) तेली समाज हा ओबीसी समाजातील एक महत्त्वाचा घटक असून हा समाज कष्टकरी व स्वाभिमानी समाज म्हणून ओळखल्या जातो महाराष्ट्रामध्ये हा समाज सर्वदूर विखुरलेला आहे आणि जालना शहर व ग्रामीण भागात हा समाज मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे.
नागपूर, जून २०२५: तेली समाज सांस्कृतिक सेवा मंडळ आणि वर वधू सूचक मंडळ, महाराष्ट्र राज्य मुख्यालय, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जवाहर वस्तीगृहाच्या निवडणुकीत संताजी विकास पॅनलच्या यशस्वी विजयानंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा जाहीर सत्कार सोहळा तिरंगा चौक, नागपूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.