Sant Santaji Maharaj Jagnade
धाराशिव - धाराशिव येथे संत जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील संत जगनाडे महाराज चौकात जयंती सोहळा साजरा करण्यात आला. उपस्थित मान्यवरानी यावेळी संताजी जगनाडे महाराज यांच्या कार्याचा गौरव केला.
मंगळवेढा (जि. सोलापूर)। संत तुकाराम महाराजांचे प्रिय शिष्य, अभंग गाथेचे रक्षक व तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंदाची जयंती मंगळवेढ्यातील श्री संत दामाजी मंदिरात अतिशय भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. हा सोहळा वीरशैव लिंगायत तेली समाज मंगळवेढा व महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
श्री संत संताजी महाराज व विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रथम वर्धापन दिन व श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सव ध्रुवनगर ,सातपूर, नाशिक येथे सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
दिनांक ०८ डिसेंबर २०२५ रोजी तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी, श्री.संत संताजी जगनाडे महाराज यांच्या ४०१ वी जयंतीनिमित्त सांगली येथे श्री. संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कोकणवासी तेली समाज सेवा संघ सांगली चे अध्यक्ष लहु (दादा) भडेकर . सखाराम महाडिक
तेली समाजाचे आराध्य दैवत राष्ट्रसंत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी संताजी जगनाडे महाराज यांचे विचार आजच्या नवीन पिढीला चांगल्या संस्काराची गरज आहे. राष्ट्रसंत श्री संताजी जगनाडे महाराजांनी केलेल्या कार्यामुळे जगद्गुरू तुकोबारायांचे अभंग आपल्या पर्यंत पोहचले पाहिजेत. संताजी महाराजांना अक्षर ओळख, गणिताचे शिक्षण मिळाले होते.