Sant Santaji Maharaj Jagnade
नाशिक - संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती यंदा नाशिकमध्ये अतिशय भव्यदिव्य स्वरूपात साजरी होणार आहे. श्री संताजी महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, रणरागिणी महिला मंडळ व श्री संताजी युवक मंडळ (पंचवटी विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, ८ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता भव्य शोभायात्रा व अभिवादन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
खळेगांव येथे महाप्रसाद व अभिवादन सोहळा, तेली समाजाचा उत्साह शिगेलाबुलढाणा - संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची ४०१ वी जयंती यंदा तेली समाज बुलढाण्यात उत्साहात साजरी करणार आहे. जय संताजी तेली समाज व जय संताजी नवयुवक मंडळ, खळेगांव (ता. लोणार) यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, ८ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत भव्य अभिवादन सोहळा
रंगभरण व निबंध स्पर्धा, विजेत्यांना आकर्षक बक्षिसे !धुळे - खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या ४०१ व्या जयंतीनिमित्त यंदा विशेष उत्साह दिसत आहे. मंडळाने रविवार, ७ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून दोन भव्य स्पर्धांचे आयोजन केले आहे – रंगभरण स्पर्धा आणि निबंध स्पर्धा.
संताजी ब्रिगेड व तेली समाज महासभेच्या वतीने शोभायात्रा व महाप्रसादाचे आयोजननागपूर : संताजी ब्रिगेड महाराष्ट्र व तेली समाज महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा-२०२५ अत्यंत भव्यदिव्य स्वरूपात साजरा होणार आहे. हा सोहळा सोमवार, दि. ८ डिसेंबर २०२५ रोजी संपन्न होईल.
आसगाव : संत श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म ८ डिसेंबर १६२४ रोजी झाला. असून त्याच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. यानिमित्ताने संताजी समितीकडून महाराष्ट्र वारकरी विद्यापीठच्या माध्यमातून संतांच्या जीवन कार्यावर आधारित प्रश्न मंजूषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.