Sant Santaji Maharaj Jagnade
जिल्हा विकासाच्या मार्गाने घोडदौड करेल - मंत्री ना. जयकुमार रावलशिरपुर : राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपचे मजबूत सरकार आहे. त्यामुळे जिल्ह्यात राज्याच्या सरकारच्या वतीने काही कमी पडू देणार नाही. तर जिल्ह्यात आता पाचही आमदार एकाच विचाराचे असल्याने जिल्हा विकासाच्या मार्गाने घोडदौड करेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे पणन व राज शिष्टाचार मंत्री ना. जयकुमार रावल यांनी व्यक्त केले
शिर्डी ग्रामस्थ व शिर्डी शहर तेली समाजाचे वतीने श्री संत संताजी महाराज जगनाडे यांची दि.२८ डिसेंबर २०२४ रोजी श्री संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी कार्यक्रम यानिमित्ताने श्री विठ्ठल मंदिर कनकुरी रोड शिर्डी येथे सकाळी १०:०० वाजता पुण्यतिथी निमित्ताने अभिषेक पूजा करण्यात आली यानंतर हभप उदय महाराज घोडके यांचे सुमधुर प्रवचन संपन्न झाले
वीरशैव तेली समाज लातूर यांच्यातर्फे नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचा प्रकाशनाचा शुक्रवार दिनांक २७ डिसेंबर रोजी कार्यक्रम भालचंद्र ब्लड बँक येथील हॉलमध्ये पार पडला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे श्री. उमाकांतआप्पा कोरे,( सचिव -वीरशैव समाज लातूर.) श्री. अशोकभाऊ भोसले (विश्वस्त-सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवालय लातूर ) श्री. बसवंत आप्पा भरडे (सचिव-श्री जय जगदंबा नवरात्र महोत्सव मंडल लातूर )
वीरशैव लिंगायत तेली समाजसेवी संस्था, बार्शी. आयोजित, राज्यव्यापी वधु-वर पालक परिचय मेळावा रविवार दि. २९/१२/२०२४ रोजी वधू-वर नांव नोंदणी : सकाळी ९ पासून कार्यक्रमाचे उद्घाटन व दिपप्रज्वलन : दुपारी १२:१५ मि. स्नेह भोजन : दुपारी १ ते २ वधु-वर पालक परिचय मेळावा : दुपारी २ ते ५ स्थळ :वीरशैव लिंगायत बोर्डिंग, ऐनापूर मारुती मंदीर जवळ, बार्शी. जि. सोलापूर.
श्री संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सोहळा समस्त तिळवण तेली समाज संघटना, कोरेगाव मार्गशीर्ष कृ. १३ शनिवार दि. २८ डिसेंबर २०२४ रोजी स्थळ : श्री क्षेत्र विठ्ठलवाडी (अंबवडे सं. कोरेगाव) पुष्पवृष्टी दु. ०१.०५ वाजता मुख्य पाहुणे - मा. सागर नारायण वीरकर (कोरेगाव पंचायत नगरसेवक) मा. चंद्रकांत वाघचौडे (जाखनगाव उपसरपंच)